बर्लिन : २००६च्या फुटबॉल विश्वचषकाच्या दावेदारीसाठी दोषी अधिकारी जॅक वॉर्नर यांना मतांची जुळवाजुळव करण्यासाठी जर्मनीने लाखो डॉलरचे पॅकेज देण्याचे प्रलोभन दिले होते. एका मॅगझिनने हा दावा केला आहे.स्पर्धेच्या यजमानपदाचा अधिकार मिळविण्यासाठी जर्मनीने मतांचा घोडेबाजार केल्याचा या मॅगझीनने आॅक्टोबरमध्ये गौप्यस्फोट केला होता. वॉर्नर आणि त्यांच्या त्रिनिदाद व टोबेगो संघटनेदरम्यान जर्मनीने केलेल्या कराराची प्रत त्यांच्याकडे असल्याचा या मॅगझीनचा दावा आहे. वॉर्नर हे उत्तर, मध्य अमेरिका, कॅरेबियन फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष होते. अमेरिकेने मे महिन्यात ज्या १४ फुटबॉल अधिकाऱ्यांवर लाचखोरीच्या आरोपात कारवाई केली. त्यात वॉर्नर यांचादेखील समावेश आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपातून ‘ली’ मुक्तन्यूयॉर्क : कोस्टारिका फुटबॉल संघटनेचे माजी अध्यक्ष एडुआर्डो ली यांची कथित भ्रष्टाचाराच्या आरोपातून ब्रुकलीन फेडरल न्यायालयाने मुक्तता केली आहे. अमेरिकन न्याय विभागाने मे महिन्यात ली यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तसेच, सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या सात आरोपींमध्येदेखील ली यांचा समावेश होता. अमेरिकन न्याय विभागाने ली यांच्यावर २०१८ मध्ये होणाऱ्या विश्वचषक पात्रता स्पर्धेचे मार्के टिंग अधिकार देण्याच्या बदल्यात लाच स्वीकारल्याचा आरोप केला होता. अमेरिकन तपास यंत्रणांनी भ्रष्टाचारप्रकरणी ४१ व्यक्तींवर ठपका ठेवला आहे. त्यात जागतिक फुटबॉल महासंघाचे माजी अध्यक्ष सॅप ब्लाटर यांचादेखील समावेश आहे.
जर्मनीने केली मतांची खरेदी
By admin | Published: December 20, 2015 2:51 AM