शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

जर्मनीची विजयी सलामी

By admin | Published: June 21, 2017 12:45 AM

विश्वविजेत्या जर्मनीने फिफा कॉन्फेडरेशन्स कप फुटबॉल स्पर्धेची यशस्वी सुरुवात करताना अटीतटीच्या सामन्यात आॅस्टे्रलियाचे आव्हान ३-२ असे परतावले

मॉस्को : विश्वविजेत्या जर्मनीने फिफा कॉन्फेडरेशन्स कप फुटबॉल स्पर्धेची यशस्वी सुरुवात करताना अटीतटीच्या सामन्यात आॅस्टे्रलियाचे आव्हान ३-२ असे परतावले. सोमवारी झालेल्या या सामन्यात तुलनेत दुबळ्या असलेल्या आॅस्टे्रलियाविरुद्ध विजयासाठी जर्मनीला चांगलेच झुंजावे लागले. सामन्यात विश्वविजेत्यास साजेशी सुरुवात करताना जर्मनीने आक्रमक खेळ करताना आॅस्टे्रलियावर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला. लार्स स्टिंडल याने पाचव्याच मिनिटाला आक्रमक गोल करून जर्मनीला आघाडीवर नेले. मात्र, आॅस्टे्रलियाने जोरदार प्रत्युत्तर दिले. टॉम रॉजिक याने ४०व्या मिनिटाला महत्त्वपूर्ण गोल करताना आॅस्टे्रलियाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. मात्र, यानंतर केवळ चार मिनिटांनी जर्मनीला पेनल्टी किक मिळाली आणि ही संधी सत्कारणी लावत ज्युलियन ड्रॅक्सलरने जर्मनीला २-१ असे आघाडीवर नेले. जर्मनीने मध्यंतराला हीच आघाडी कायम राखत नियंत्रण राखले. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच जर्मनीच्या लिआॅन गोरेत्झका याने संघाचा तिसरा गोल साकारला. या जोरावर जर्मनीने आपली आघाडी ३-१ अशी भक्कम केली. मात्र, आठ मिनिटांनंतर टॉमी ज्युरिक याने अप्रतिम गोल केल्याने आॅस्टे्रलियाने २-३ अशी पिछाडी कमी केली. यावेळी आॅस्टे्रलिया अनपेक्षित निकाल लावणार अशी शक्यता होती.मात्र, यानंतर जर्मनीने भक्कम बचावावर जोर देताना कोणताही अतिरिक्त धोका न पत्करता अखेरपर्यंत आघाडी कायम राखून विजयी सलामी दिली. (वृत्तसंस्था)