पॅरिस : बलाढ्य इंग्लंडला नॉकआऊ ट पंच देऊन उपांत्यपूर्व फेरीत दाखल झालेल्या आईसलँडविरुद्ध आज यजमान फ्रान्सची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. होमग्राऊं ड आणि होम क्राऊ डचा पाठिंबा असला तरी सव्वातीन लाख लोकसंख्येच्या छोट्या देशाकडून पराभूत न होण्याचे दडपण फ्रान्सवरच असणार हे नक्की.आईसलँडविरुद्ध विजय मिळवण्यासाठी यजमान फ्रान्सला सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करीत आघाडी घेणे गरजेचे आहे. फ्रान्सने आपले स्पर्धेतील सहाही गोल दुसऱ्या हाफमध्ये केलेले आहेत, परंतु उद्याच्या सामन्यात त्यांना पहिल्यापासूनच आघाडी घेणे गरजेचे आहे. राऊं ड १६ मध्ये आईसलँडने इंग्लंडला २-१ ने हरवून पहिल्यांदाच मोठ्या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पहिल्या २० मिनिटांतच आईसलँडने २-१ ची आघाडी मिळवली होती. आईसलँड आज ४-४-२ या नेहमीच्या फॉर्म्युल्यानुसारच खेळेल, अशी शक्यता आहे. याउलट फ्रान्सने संथ सुरुवात करून दुसऱ्या हाफमध्ये आक्रमक खेळ केला आहे. पण ही नीती फ्रान्सला उद्या बदलावी लागेल. आयर्लंडविरुद्ध दोन गोल करणारा अँथोनी ग्रिजमन यानेसुद्धा ही गोष्ट मान्य केली आहे. तो म्हणतो, की आम्ही सुरुवातीला खराब खेळतो, पण सुदैवाने नंतर आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणली आहे, या गोष्टीत बदल करावा लागेल, कारण प्रत्येक वेळी आम्हाला यश येईल असे नाही. सेंटर बॅक आदिल रामी आणि मिडफिल्डर एन. गोलो कांटे यांच्या निलंबनामुळे फ्रान्सची अडचण वाढली आहे. बार्सिलोनाकडून खेळणाऱ्या सॅम्युएल उमितीला आज संधी मिळण्याची शक्यता आहे.(वृत्तसंस्था)
फ्रान्सची प्रतिष्ठा पणाला
By admin | Published: July 03, 2016 4:27 AM