शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
2
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
3
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
4
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
5
घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
6
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
7
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
8
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
9
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
10
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
11
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
12
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
13
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
14
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
15
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
16
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
17
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
18
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
19
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
20
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी

घानाची द. कोरियाला मजबूत किक, विजयासह कायम राखल्या आशा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 12:16 PM

विजयासह कायम राखल्या आशा

अल रयान (कतार) : जागतिक क्रमवारीत ६१व्या स्थानी असलेल्या घाना संघाने धक्कादायक विजय मिळवताना जागतिक क्रमवारीत २८व्या स्थानी असलेल्या दक्षिण कोरियाला ३-२ असा धक्का दिला. या दिमाखदार विजयासह घानाने ह गटातून फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीच्या आशा कायम राखल्या. तसेच, दक्षिण कोरियाची वाटचाल आता बिकट झाली असून, त्यांना स्पर्धेत आगेकूच करण्यासाठी आपल्या अखेरच्या सामन्यात बलाढ्य उरुग्वेला नमवावेच लागेल. 

एज्युकेशन स्टेडियमवर झालेल्या सामन्यात घानाने सुरुवातीपासून दमदार खेळ करत कोरियन संघाला झुंजवले. सलामीला तगड्या पोर्तुगालला विजयासाठी झुंजविल्यानंतर घानाचा आत्मविश्वास अधिक उंचावला होता. मोहम्मद कुडूसने दोन गोल करत घानाकडून निर्णायक खेळ केला. मोहम्मद सलिसू याने २४व्या मिनिटाला गोल करत घानाला १-० अशी आघाडी मिळवून दिल्यानंतर कुडुसने ३४व्या मिनिटाला गोल करत घानाला मध्यंतराला २-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात मात्र कोरियन खेळाडूंनी जबरदस्त मुसंडी मारली. चो ग्यु-सुंग याने तीन मिनिटांत दोन अप्रतिम हेडरद्वारे ५८व्या आणि ६१व्या मिनिटाला गोल करत दक्षिण कोरियाला २-२ अशी महत्त्वपूर्ण बरोबरी साधून दिली. यावेळी कोरिया बाजी मारणार असे दिसत असताना पुन्हा एकदा कुडुसने ६८व्या मिनिटाला निर्णायक गोल करत घानाला ३-२ आघाडीवर नेले. हीच आघाडी अखेरपर्यंत कायम राखत घानाने बाजी मारली.

प्रशिक्षकांना ‘रेड कार्ड’सामना संपल्यानंतर नाट्यमय प्रसंग घडले. निर्धारी ९० मिनिटांच्या खेळानंतर सामन्यात १० मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला. यावेळी अंतिम क्षणी कोरियाने पेनल्टी कॉर्नर मिळवला होता, मात्र त्याचवेळी रेफ्रींनी सामना सपल्याचे जाहीर केले. यावर कोरियाच्या भडकलेले प्रशिक्षक पावलो बेंटो यांनी थेट मैदानावर धाव घेत रेफ्रींशी हुज्जत घातली. यावर रेफ्रींनी त्यांना रेड कार्ड दाखवले. यामुळे आता पोर्तुगालविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यासाठी बेंटो आपल्या संघासोबत मैदानात उपस्थित राहू शकणार नाही. 

घानाच्या मोहम्मद कुडोसने केलेले दोन मैदानी गोल विजयातील अंतर स्पष्ट करणारे ठरले.

विश्वचषक सामन्यात दोन गोल करणारा २२ वर्षीय मोहम्मद कुडुस हा नायजेरियाच्या अहमेद मुसानंतरचा (२१ वर्ष, २०१४) दुसरा आफ्रिकन युवा खेळाडू  ठरला. 

विश्वचषक सामन्यात घानाने पहिल्यांदाच तीन गोल  केले.

सलग आठव्या विश्वचषक सामन्यात घानाने गोल करण्याचा पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा पहिला आफ्रिकन संघ.

 

टॅग्स :FootballफुटबॉलFifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२