मुंबई : गं. द. आंबेकर स्मृती क्रीडा महोत्सव येत्या रविवारी, ९ डिसेंबरपासून सुरू होत आहे. गिरणगावात राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे ‘आंबेकर स्मृती सप्ताह’ साजरा होत असून यंदाचा आंबेकर स्मृती सप्ताह ७ ते १३ डिसेंबर पर्यंत पार पडत आहे. या सप्ताहांतर्गत क्रीडा महोत्सवाला सुरुवात होत आहे.परळच्या टाटा मिल चाळ कंपाऊंडमध्ये रविवारी प्रथम श्रेणी नामवंत व्यवसायिक शुटिंग बॉलच्या स्पर्धा पार पडतील. सकाळी १० ते ६ या वेळेत स्पर्धांना सुरूवात होईल. एकूण १६ नामवंत संघ या स्पर्धेत उतरणार आहेत. सोमवारी १० डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता ना.म.जोशी मार्गावरील श्रमिक जिमखाना येथे प्रथम श्रेणी व्यवसायिक पुरुष गट, द्वितीय श्रेणी स्थानिक पुरुष व महिला गटाच्या स्पर्धा पार पडत आहेत. या स्पर्धेत व्यवसायिक अ गटाचे १६ नामवंत संघ खेळत आहेत. द्वितीय श्रेणी महिला ब गटात १२, तर स्थानिक पुरुष ब गटात २४ संघ खेळणार आहेत. मंगळवारी ११ डिसेंबरला सकाळी ९ ते १२ या वेळेत श्रमिक जिमखाना येथे शालेय मुंबई सुपर लिग कबड्डी स्पर्धा प्रथमच पार पडत आहेत. तर बुधवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्रमिक जिमखाना येथेच सकाळी ९ ते १२ या वेळेत शालेय मुंबई सुपर लिगचे अंतिम सामने आणि तिन्ही कबड्डी सामान्यांच्या अंतिम लढती सायंकाळी ६ वाजेनंतर पार पडतील. रात्रौ ८ वाजता संघ व मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर, संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते बक्षीस वितरण पार पडेल.>गिरणी कामगारांसाठी रस्सीखेच स्पर्धाश्रमिकच्या मैदानावर गिरणी कामगारांसाठी पारंपरिक रस्सीखेच स्पर्धाही पार पडणार आहे. महिलांच्या विविध स्पर्धा, आयडियल स्पोर्टस क्लबच्या आयोजनाखाली आंबेकर प्रतिष्ठान महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या कॅरम स्पर्धा संघाच्या सभागृहात, तर क्रिकेट स्पर्धा पुरंदरे स्टेडियम येथे पार पडणार आहेत. या स्पर्धेत गिरणी कामगारही सहभागी होणार आहेत.
गिरणगावात गं. द. आंबेकर क्रीडा महोत्सवाची धूम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 1:58 AM