शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

मलाही पद्मभूषण द्या!

By admin | Published: January 04, 2015 1:33 AM

आपणही पद्मभूषण पुरस्कारासाठी पात्र आहोत. पद्मश्री पुरस्कारानंतर पद्मभूषणसाठी पाच वर्षांची जी अट आहे तीमी देखील पूर्ण करते.

‘फुलराणी’कडे दुर्लक्ष : सायनाचा पुरस्कारातून अर्ज बादनवी दिल्ली : आपणही पद्मभूषण पुरस्कारासाठी पात्र आहोत. पद्मश्री पुरस्कारानंतर पद्मभूषणसाठी पाच वर्षांची जी अट आहे तीमी देखील पूर्ण करते. सुशील कुमार ही अट पूर्ण करीत असेल आणि पुरस्कारसाठी पात्र भरत असेल, तर मी का नाही, असा सवाल करीत मलादेखील हा पुरस्कार मिळायला हवा, या शब्दांत सायना नेहवाल हिने स्वत:ची कैफियत मांडली. सायना आणि सुशील यांना २०१० मध्ये एकाचवेळी पद्मश्रीने गौरविण्यात आले होते, हे विशेष!भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिचा पद्मभूषण पुरस्काराच्या यादीतून अर्ज बाद करण्यात आल्याने तिने केंद्रीय क्रीडा मंत्रालयावर नाराजी व्यक्त केली आहे. या आॅलिम्पिक कांस्यपदक विजेत्या खेळाडूची भारतीय बॅडमिंटन संघाने गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात क्रीडा मंत्र्यालयाकडे पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस केली होती. मात्र, मंत्रालयाने दोन वेळचा आॅलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार याची यंदाच्या पुरस्कारासाठी निवड केली आहे. सुशील कुमार हा सायनापेक्षा अधिक पात्र उमेदवार असल्याचा दावा क्रीडा मंत्रालयाने केला आहे. त्यावर सायनाने आपणही हकदार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. ती म्हणाली, की मी असे ऐकले आहे की, एका विशेष कारणास्तव सुशील कुमारचे नाव पुरस्कारासाठी पाठविण्यात आले आहे. क्रीडा मंत्रालयाने गृह मंत्रालयाकडे माझे नाव पाठविले नाही. मंत्रालयाच्या दिशानिर्देशानुसार पद्म पुरस्कारांमध्ये पाच वर्षांचे अंतर असायला हवे. यासाठी जर ते त्याचे नाव पाठवत असतील, तर माझ्या नावाचीही शिफारस का नाही केली? मीसुद्धा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केला असून, मला याबाबत दु:ख होत आहे. सायनाने दावा केला, की याच आधारावर गेल्या वर्षीसुद्धा तिचा अर्ज बाद करण्यात आला होता. सुशीलने पाच वर्षांच्या अंतराचा नियम पूर्ण केला नसूनही या वर्षी मंत्रालयाने त्याच्या नावाची शिफारस केली आहे, याबाबत आश्चर्य वाटते.(वृत्तसंस्था)मी पद्मभूषण मागितला नाहीमी या पुरस्काराची मागणी केलेली नाही. माझा प्रश्न एवढाच होता, की गृहमंत्रालयाकडे माझ्या नावाची शिफारस का गेली नाही, शिफारस केल्या नंतरच समिती काही तरी निर्णय घेऊ शकते. दोन पद्मश्री पुरस्कार दरम्यान पाच वर्षांचे अंतर हवे हे मला माहिती आहे. बॅडमिंटन महासंघाने पद्मभूषणसाठी प्रस्ताव पाठविला होता, परंतु नियमांच्या अडचणींमुळे देण्यात येणार नसल्याचे कारण सांगून अर्ज बाद करण्यात आला. - सायना नेहवालप्रत्येक अर्जदारास पुरस्कार मिळू शकत नाही : गिलसायनाने व्यक्त केलेल्या नाराजीनंतर माजी केंद्रीय क्रीडा मंत्री एम. एस. गिल यांनी म्हटले, की प्रत्येक अर्जदारास पद्मभूषण पुरस्कार दिला जाऊ शकत नाही. जर देशाला वाटत असेल की तुम्ही या पुरस्कारासाठी पात्र आहात, तर तुम्हाला नक्कीच सन्मानित केल्या जाईल. यावर अंतिम निर्णय देण्याचा अधिकार हा देशाला आहे.हा प्रशंसनीय निर्णय : सत्पालदोन वेळचा आॅलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार याची पद्मभूषण पुरस्कारासाठी करण्यात आलेली शिफारस हा प्रशंसनीय निर्णय असल्याचे मत द्रोणाचार्य पुरस्कार विजेते, तसेच सुशीलचे गुरू महाबली सत्पाल यांनी व्यक्त केले आहे.सत्पाल म्हणाले, की एक प्रशिक्षक आणि माजी कुस्तीपटू या नात्याने मी सुशीलवर खूप खूष आहे. सलग दोन वेळा आॅलिम्पिक पदक पटकाविणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. क्रीडा मंत्रालयाने त्याच्या नावाची केलेली शिफारस हा खरोखरंच अभिनंदनीय निर्णय आहे. सायनाचा पद्मभूषण पुरस्कारासाठी विचार केला गेला नाही. आपण आपली झोळी कधीच पुढे करायची नसते; तुमच्यात ताकद असेल, तर नक्कीच विचार होईल.- ज्वाला गुट्टा