पुणे - बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात नुकत्याच पार पडलेल्या आशियाई गोजु रियु कराटे अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा दबदबा पाहायला मिळाला. भारताच्या यजमानपदाखाली पार पडलेल्या या स्पर्धेत नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, कझाकस्तान, मलेशिया आदी आठ देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी १५ सुवर्ण, ८ रौप्य अन् ५ कांस्य अशी एकूण २८ पदकं जिंकली. यावेळी ए.जी.के.एफचे प्रेसिडेंट शिहान बी. आर. मित्रा, डब्ल्यूजीकेएफचे खजिनदार पीटर हम्स आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या स्पर्धेचे आयोजन UGKFI युनियन गोजू रियू कराटे डो फेडरेशन इंडिया ने केलें होते UGKFI चे अध्यक्ष /संस्थापक शिहान धिरज पवार यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली या वेळी भारत या देशाला यजमान पदाचा मान मिळाला. जी.के.एम.ए असोसिएशनचे अध्यक्ष/ संस्थापक शिहान प्रेम खडका यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेत एकूण २० खेळाडूंनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आणि तब्बल २८ पदकं जिंकली. महाराष्ट्र रेफरी कमिशन चे अध्यक्ष सेंसाई शंकर विश्वकर्मा MUGKA महाराष्ट्र युनियन गोजू रियू कराटे डो असोसिएशनचे सचिव किरण खोत, सेन्साई आशिष खड्का यांनी जी.के.एम.ए मधून पंच म्हणून भूमिका बजावली.
पदक विजेत्या खेळाडूंची नावे व क्रीडाप्रकार
- युवन साई गुडूगूंतला - सुवर्णपदक ( कुमिते)
- रिषिता काटेगरी - रौप्यपदक ( सांघिक कुमिते)
- हृषिकेश कांची - रौप्यपदक ( सांघिक कुमिते)
- हवीश कांची - रौप्यपदक ( सांघिक कुमिते )
- नरसिम्हा रेवल्ले - रौप्यपदक ( सांघिक कुमिते ) व कांस्यपदक ( काता)
- हेमंत कुमार रेड्डी पोट्टीपटी - २ सुवर्णपदक ( कुमिते व सांघिक कुमिते)
- भरत बाबू बेजावडा - २ सुवर्णपदक ( सांघिक कुमते व कुमिते )
- शान मिराज दुडेकुला - सुवर्णपदक ( सांघिक कुमिते ) व रौप्यपदक ( काता)
- वेंकटा श्री दिनेश मन्नेपू - २ सुवर्णपदक ( सांघिक कुमिते व कुमिते)
- वेदाकृष्णा काटेगरी - कांस्यपदक ( कुमिते )
- गीता वाणी इरुकला - २ सुवर्णपदक ( काता व कुमिते)
- मीरा रामबडे - कांस्यपदक ( काता)
- समृद्धी रामबडे - सुवर्णपदक ( कुमिते )
- रितेश सिंग लोहार - कांस्यपदक ( कुमिते )
- सागर सिंग - २ सुवर्णपदक ( काता व कुमिते )
- निर्मल जर्घा - सुवर्णपदक ( कुमिते ) व रौप्यपदक ( काता)
- अतुल सुखाये - सुवर्णपदक ( कुमिते )
- प्रमोद साही - कांस्यपदक ( काता )
- हर्का थापा - रौप्यपदक ( काता )
- सुमित राय - रौप्यपदक ( कुमिते )