शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

आनंद संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी

By admin | Published: October 08, 2016 3:45 AM

विश्वनाथन आनंद याने दहाव्या ताल मेमोरियल बुद्धिबळ स्पर्धेत शुक्रवारी येथे अर्मेनियाचा लेवोन आरोनियन याच्यासोबतची लढत बरोबरीत सोडवली.

मॉस्को : पाच वेळचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद याने दहाव्या ताल मेमोरियल बुद्धिबळ स्पर्धेत शुक्रवारी येथे अर्मेनियाचा लेवोन आरोनियन याच्यासोबतची लढत बरोबरीत सोडवली. त्याचबरोबर, तो संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानावर राहिला.आनंदसाठी ही स्पर्धा संमिश्र यशाची ठरली. त्यात त्याला काही रेटिंग गुण मिळतील. या स्पर्धेत त्याने २ डाव जिंकले. एका डावात त्याला पराभव पत्करावा लागला आणि ६ डाव बरोबरीत सुटले.आरोनियनविरुद्धची लढत चुरशीची झाली. तथापि, आनंद इटालियन ओपनिंगने विजयाच्या स्थितीत पोहोचू शकला नाही. या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांनी ४० चालींनंतर ड्रॉवर सहमती दर्शवली. रशियाच्या इयान नेपोमनियाचीने अखेरच्या फेरीत इस्राईलच्या बोरिस गेलफंडविरुद्ध बरोबरी साधून विजेतेपद पटकावले. (वृत्तसंस्था)त्यामुळे त्याला दोन लाख डॉलर बक्षीस रक्कम मिळाली. त्याने गेल्या चार फेऱ्यांत आघाडी मिळविली होती आणि अखेरपर्यंत ती कायम ठेवली. नेपोमनियाचीने स्पर्धेत ६ गुण नोंदविले आहेत आणि तो अनीस गिरीपेक्षा अर्ध्या गुणाने पुढे राहिला. त्याने चीनच्या ली चाओविरुद्ध विजयाची संधी गमावली. एक वेळ गिरी सुस्थितीत होता व तो विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरेल, असे वाटत होते; परंतु नेदरलँड्सच्या या खेळाडूला फायदा घेता आला नाही आणि अखेर त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. गिरीचे ५.५ गुण झाले. आरोनियन आणि आनंद प्रत्येक ५ गुणांसह संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानावर राहिले आहेत. रशियाचा व्लादिमीर क्रॅमनिक, पीटर श्वेडलर, ली चाओ आणि अझरबैजानचा शखरियार मामेदयारोव ४.५ गुणांसह संयुक्तरीत्या पाचव्या स्थानी राहिले.