नवी दिल्ली : विराट कोहलीची बॅट तळपली की तलवारीसारखी काम करते. हा स्फोटक फलंदाज धावांचा पाऊस पाडण्यात तरबेज असल्याने मला त्याच्यात वेस्ट इंडिजचा महान फलंदाज विव्हियन रिचर्डस्ची झलक दिसत असल्याचे भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांचे मत आहे. कोहलीच्या खेळावर प्रभावित असलेल्या शास्त्रीने भारतात आयोजित विश्व टी-२० स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या आकलन केले. शास्त्री म्हणाले,‘कोहलीची फलंदाजी मला विव्ह रिचर्डस्ची आठवण करून देते. रिचर्डस् मैदानावर असताना स्वत:चे वर्चस्व कायम करायचा. रिचर्डस्प्रमाणे कोहलीचा खेळ सतत बहरतो. रिचर्डस्ने स्वत: कोहलीत मला स्वत:च्या खेळाची झलक दिसत असल्याचे म्हटले होते. कोहलीला यामुळे प्रेरणा मिळाली. कोहलीने आॅस्ट्रेलियाविरुद्ध वन डे मालिकेत दोन शतके आणि तिन्ही टी-२० सामन्यांत अर्धशतके ठोकली होती. कोहली, धवन आणि रोहित शर्मा हे जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचे शास्त्री यांचे मत आहे. रोहितमध्ये क्लास आहे तर विराट आक्रमक आहे, असे सांगून शास्त्री म्हणाले,‘२०१४ मध्ये इंग्लंड दौऱ्यात खराब कामगिरीनंतर चांगल्या कामगिरीच्या बळावर संघात पुनरागमनाचे श्रेय कोहलीने शास्त्री यांना दिले होते. आधी विराट आॅफ स्टम्पबाहेर जाणाऱ्या प्रत्येक चेंडूमध्ये बॅट टाकण्याच्या नादात असायचा. आता तो मिडल आणि आॅफ स्टम्प असा गार्ड घेतो. यावर शास्त्री म्हणाले,‘विराट सुधारणा करण्यासाठी सज्ज होता. इच्छा असेल तर सर्व समस्यांवर तोडगा निघतोच. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू वैयक्तिकरीत्या भक्कम असल्यामुळेच कसोटी व टी-२० प्रकारात भारतीय संघ अव्वल स्थानावर पोहोचू शकला. वन डेत खेळाडू एकमेकांच्या यशासाठी खेळतात. आमच्या संघात तिन्ही प्रकारात सुधारणा घडून आली आहे. याशिवाय गेल्या १४ महिन्यात संघाचे क्षेत्ररक्षण कमालीचे सुधारले आहे. या विभागात मागचा इतिहास विसरून पुढे काम केल्यामुळेच क्षेत्ररक्षण सुधारले आहे.’(वृत्तसंस्था)
कोहलीमध्ये विव्ह रिचर्डस्ची झलक
By admin | Published: February 05, 2016 3:34 AM