मुंबई : गेल्यावर्षी माझे नाव केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने खेळाडूंसाठी सुरु केलेल्या ‘टॉप्स’ योजनेमध्ये होते. मात्र, नुकताच जाहीर केलेल्या यादीमध्ये माझा समावेश नसल्याची मोठी खंत आहे. ही योजना खेळाडूंसाठी खूप महत्त्वाची असल्याने पुढील आॅलिम्पिकसाठी याचा खूप मोठा फायदा होईल,’ अशी महाराष्ट्राचा ओलिम्पियन रोइंगपटू दत्तू भोकनळ याने प्रतिक्रीया दिली.सह्याद्री अतिथीगृह येथे गुरुवारी राज्य सरकारच्या वतीने रिओ आॅलिम्पिक, पॅरालिम्पिक स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू, महाराष्ट्राचे सहभागी खेळाडू, महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील महाराष्ट्राचे खेळाडू तसेच मार्गदर्शक अशा एकूण २३ जणांचा रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. राज्य क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते खेळाडूंना गौरविण्यात आले.यावेळी दत्तूने टॉप्स योजनेतून वगळण्यात आल्याची खंत व्यक्त करताना म्हटले की, ‘टॉप्स’मध्ये पुन्हा समावेश होण्यासाठी मी राज्य क्रीडामंत्री तावडे व केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांच्याशीही बोललो असून त्यांनी याबाबत मला आश्वासन दिले आहे. मिळणाºया निधीचा सरावासाठी खूप फायदा होईल. निधी किती असणार हे अद्याप जाहीर केलेले नाही. प्रत्येक महिन्याला खेळाडंूच्या बँक अकाऊंटमध्ये रक्कम येईल. आशियाई व आॅलिम्पिकसाठी ही मदत खूप मोलाची ठरणार आहे.’या खेळाडूंचा झाला गौरव..आॅलिम्पियन : साक्षी मलिक (५० लाख), मार्गदर्शन कुलदीप सिंग (२५ लाख), ललिता बाबर (७५ लाख), मार्गदर्शन भास्कर भोसले (२५ लाख), दत्तू भोकनळ (५० लाख), देविंदर वाल्मिकी (५० लाख), कविता राऊत (५० लाख), आयोनिका पॉल (५० लाख), प्रार्थना ठोंबरे (५० लाख).पॅरालिम्पियन : मरियप्पन थंगावेलू (१ कोटी), मार्गदर्शक सत्यनारायण (२५ लाख), देवेंद्र झांझरिया (१ कोटी), मार्गदर्शक सुनिल तंवर (२५ लाख), दीपा मलिक (७५ लाख), मार्गदर्शन वैभव सरोही (१८.७५ लाख), वरुन भाटी (५० लाख), मार्गदर्शन सत्यनारायण (१२.५० लाख), सुयश जाधव (५० लाख).महिला क्रिकेटपटू : मोना मेश्राम, पूनम राऊत, स्मृती मानधना (तिघींना ५० लाख), संघ व्यवस्थापक तृप्ती भट्टाचार्य (१० लाख), फिजिओ रश्मी पवार (१० लाख) आणि सायकलपटू ओमकार जाधव (६ लाख)आगमी दक्षिण आफ्रिका दौºयासाठी संघ तयारीला लागला असून याआधी देशांतर्गत सामने होणार असल्याने आम्हाला चांगला सराव मिळेल. वर्ल्डकप आधी आम्ही आफ्रिका दौरा केला असल्याने तेथील परिस्थितींची जाणीव आहे. शिवाय याच दरम्यान पुरुष क्रिकेट संघही आफ्रिका दौºयावर जाणार आहे. त्यांना आफ्रिकेतील परिस्थितींचा खूप चांगला अनुभव असल्याने त्यांचा सल्ला आम्हाला निश्चित मोलाचा ठरेल. - पूनम राऊत, भारताची सलामीवीर
पदक विजेत्या खेळाडूंचा राज्य सरकारकडून गौरव; ‘टॉप्स’मध्ये समावेश न झाल्याची खंत - दत्तू भोकनळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:49 AM