शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

गोवा एफसीने खाते खोलले!

By admin | Published: November 02, 2014 12:56 AM

बदली खेळाडू टोल्गो ओज्बेने नोंदविलेल्या 89 व्या मिनिटाच्या गोलामुळे एफसी गोवा संघाला दिल्ली डायनामोसवर निसटता 2-1 गोलांचा विजय मिळविला

मडगाव : बदली खेळाडू टोल्गो ओज्बेने नोंदविलेल्या 89 व्या मिनिटाच्या गोलामुळे एफसी गोवा संघाला दिल्ली डायनामोसवर निसटता 2-1 गोलांचा विजय मिळविला व गोवा संघाची विजयाची प्रतिक्षा संपली़ या सामन्याच्या विजयाने गोवा संघाचे 4 गुण झाल़े 
सामन्याच्या पहिल्या सत्रत सुरूवातीलाच काही मिनिटांच्या अंतराने गोवा संघाकडून दोन संधी वाया गेल्या होत्या़ यात दुस:या मिनिटाला गोव्याच्या मिरोस्लाव स्लिपिका याने मारलेला फटका दिल्ली डायनामोस संघाच्या गोलरक्षकाकडे गेला़ त्यानंतर लगेच नारायण दासने मारलेला फटका दिल्लीच्या गोलरक्षकाने अडविला होता़ परत चेंडू मैदानात आला यावेळी रोमियो व मिरोस्लावने चेंडूवर कब्जा मिळविण्यात वेळ घालविली व ही संधी निसटली़
यावेळी संपूर्ण खेळावर वर्चस्व एफसी गोवा संघाचे राहिले असले तरी गोल करण्याचा नेम साधला तो दिल्ली डायनामोस संघाऩे सामन्याचे सातवे मिनिट चालू होत़े दिल्लीचा डेन्मार्कचा खेळाडू मोर्तेन स्कोवुबु याने घेतलेला कॉर्नरचा फटका हन्स मुल्टेरला मिळाला पण त्याने चेंडू स्पेनचा खेळाडू ब्रुनो आरीयसकडे सोपविला तर त्यात गोल करण्याची अधिक संधी असलेल्या मादस जुनकरला पास दिला व त्याने संधीचे परिवर्तन गोलात केले व सामन्याचा पहिला गोल नोंदविण्यात आला़ गोवा एफसीच्या खेळाडूकडून जोरदार आक्रमणो करण्यात आली़ गोल झाल्यानंतर 12 व्या मिनिटाला आंद्रे सांतोसने मिरास्लोवला पास दिला होता पण त्याने मारलेला हेडर चेंडू घेण्याच्या वेळ जुळला नसल्याने त्याची संधी हुकली़ 19 व्या मिनिटाला आणखी एक संधी गोव्याच्या संघाने दवडली़ यावेळी मिरोस्लेव स्लेपिकाने मारलेला फटका मैदानावरून किंचित डाव्या गोलपोस्टजवळून गेला़
गोवा संघाचे आघाडी व मध्य खेळाडू बरोबरी साधण्यासाठी प्रयत्न करीत होते तर 32 व्या मिनिटाला गोव्याच्या संघाला आणीख एक संधी प्राप्त झाली़ या सत्रत शेवटची संधी 82 व्या मिनिटाला पोतरुगालच्या ब्रुनो पिनहेरो याने फ्री किकवर दवडली़ दुस:या सत्रच्या पहिल्या 1क् मिनिटांच्या आत गोवा एफसी संघाने तीन संधी वाया घालविल्या़बरोबरी साधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणा:या गोव्याच्या संघाने अखेर संधी साधून 74 व्या मिनिटाला गोल केला़ यावेळी मंदारराव देसाईने चेंडू रोमियो फर्नाडिसकडे दिला तर त्याने वेळ घेऊन मैदानावर नजर मारली व लगेच उडता पास ज्वेल राजाला दिला तर त्याने हेडरवर खुली असलेली बाजू हेरून डाव्या बाजूला गोल केला़  टोल्गे ओब्जेने प्रशिक्षकांचा निर्णय सार्थ ठरवित 89 व्या मिनिटाला संघासाठी विजयी बॅक पास दिला होता तर त्याने चेंडू छातीवर घेऊन गोल मार्क केला व चेंडूला जाळीची दिशा दाखविली़ त्यानंतर सुद्धा आणखी दोन संधी गोव्याच्या संघाने वाया घालविल्या़ मात्र टोल्गेच्या निर्णायक गोलामुळे खचाखच भरलेल्या स्टेडियमवर गोव्याच्या संघाने विजय नोंदविला़ 
(क्रीडा प्रतिनिधी)
 
विजय दर्डा गोव्यासाठी लकी
खासदार आणि लोकमत वृत्तपत्र समुहाचे अध्यक्ष विजय दर्डा आजच्या सामन्याच्यावेळी उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण सामन्याचा आनंद घेतला. गोवा संघाच्या पुरस्कत्र्या उद्योगपतींनी दर्डा यांचे वैयक्तिक अभिनंदन केले. गोवा संघ पहिल्यांदा विजयी  होत आहे, तुम्ही लकी ठरलात, तुमच्या उपस्थितीमुळे आम्ही जिंकलो, अशा शब्दात त्यांनी विजय दर्डा यांचे अभिनंदन केले.
 
सुपर लीग चषक फुटबॉल स्पर्धेमुळे सारे विश्व आम्हाला जवळून पाहत आह़े यापुढे सुपरलीग व आयलीग स्पर्धेतून दज्रेदार खेळाडू निर्माण होणार आहेत़ येत्या काही वर्षात भारत 2क् वर्षाखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करीत आह़े गोवा हे फुटबॉलसाठी योग्य ठिकाण आहे, मात्र बेंगळुरूप्रमाणो फुटबॉल पाहण्यासाठी गर्दी दिसत नाही़ 
- प्रफुल्ल पटेल, अध्यक्ष, अखिल भारतीय फुटबॉल संघ