शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
2
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
5
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
6
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
7
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
8
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
9
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
10
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
11
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
12
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
13
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
14
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
17
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
18
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
20
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?

प्रीमियर लीग जिंकणे हेच ध्येय : गिरॉड

By admin | Published: March 04, 2017 12:10 AM

अर्सेनलच्या आॅलिव्हर गिरॉडला हा सिझन खूप काहीसा निराश करणारा ठरला.

अर्सेनलच्या आॅलिव्हर गिरॉडला हा सिझन खूप काहीसा निराश करणारा ठरला. बहुतांश वेळ तो बेंचवरच होता. त्याच्याऐवजी अलेक्स सांचेंझला संघ व्यवस्थापनाने पसंती दिली होती. तरीही गेल्या काही महिन्यांत गिरॉडने जबरदस्त पुनरागमन केले आहे. गेल्या नऊ सामन्यांत त्याने सहा गोल केले आहेत. अर्सेनलला त्यांच्या फॉर्मची चिंता भेडसावत आहे. बायर्न म्युनिचकडून त्यांना ५-१ असा मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे ते आघाडीच्या चेल्सापेक्षा १३ गुणांनी मागे पडले आहेत. लिव्हरपूल विरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी गिरॉडशी केलेली बातचित.अर्सेनलच्या अडखळत झालेल्या सुरुवातीनंतर तुला काय वाटते?आॅलिव्हर : कठोर मेहनत आणि दृढनिश्चयामुळेच मी हे करू शकलो. मी या सिझनच्या सुरुवातीला दुखापतीमुळे काहीसा शाशंक होतो. तसेच मला मैदानावर उतरण्यासही मिळाले नव्हते. मात्र, यावर मात करत मी पुन्हा मैदानावर उतरलो. या सर्व गोष्टींचा वापर मी मैदानावर चांगल्या सुरुवातीसाठी करू इच्छित आहे.नक्कीच तू हे केले आहेस, या सामन्यात तू गोल करणे कितपत महत्त्वाचे आहे?आॅलिव्हर : स्ट्रायकरने गोल केलाच पाहिजे. मैदानावर असताना गोल करण्याच्या संधी दवडता कामा नये. मी सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून, तो तसाच सुरु रहावा, यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत.या सामन्यात तू अंतिम संघात असणार आहेस का?आॅलिव्हर : मला याचे उत्तर माहीत नाही. याबद्दल संघ व्यवस्थापनच काय ते सांगू शकेल. पण तुम्हाला संघात प्रतिस्पर्धी असले पाहिजेत. मी एक प्रतिस्पर्धी आहे एवढेच सांगू शकेन.अंतिम संघात निवड होणे किती कठीण असते?आॅलिव्हर : नक्कीच नाही. आमची संघात मैत्रीपूर्ण स्पर्धा असते. आम्हा सर्वांनाच मैदानाची चांगली माहिती आहे. आमच्या सर्वांचेच ध्येय एकच आहे. संघात निकोप स्पर्धा असणे ही चांगलीच गोष्ट आहे. जर मी गोल करत असेन, तर मी अंतिम ११ मध्ये का नसेल?संघातील तुझ्या खेळण्याबद्दल शंका असतानाही तू पुन्हा अर्सेनलशीच करार का केलास ?आॅलिव्हर : मला अर्सेनलबरोबरच रहायचे होते. विशेषत: प्रीमियर लीग जिंकणे हे माझे ध्येय असणार आहे. हा क्लब माझ्यासाठी खास आहे म्हणून मी पुन्हा करार केला आहे.तुला कोणती ट्रॉफी जिंकण्याची सर्वाधिक इच्छा आहे ?आॅलिव्हर : ‘प्रीमियर लीग!’ प्रीमियर लीग जिंकणे हेच माझे मुख्य ध्येय आहे. त्यानंतर कदाचित मी चीनमध्येही खेळेन. मी सध्या ३० वर्षांचा आहे. प्रीमियर लीग जिंकून आणखी दोन-तीन वर्षे अर्सेनलबरोबर खेळण्याचा विचार आहे. (पीएमजी)