शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
2
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंची जाहीरच करून टाकलं
3
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
4
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
5
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
6
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
7
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
8
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
9
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
10
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
11
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
12
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
13
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
14
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
15
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
16
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
17
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
18
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
19
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
20
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही

विंडसर्फिंगमध्ये गोव्याचे पदक निश्चित!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 7:00 AM

डेरिक मिनेझिस यांचे प्रशिक्षक म्हणून नाव आघाडीवर 

सचिन कोरडे : गोव्याला मोठा समुद्र किनारा लाभला आहे. निसर्गाने भरभरून दिलेल्या या गोव्यात कुशाग्रतेचीही कमतरता नसल्याने येथे विंडसर्फर आणि सेलर्स मोठ्या प्रमाणात आहेत. नव्या विंडसर्फर्सला गरज आहे ती केवळ त्यांना पुढे आणण्याची. त्यांच्या कलागुणांना वाव मिळाल्यास गोव्यातील विंडसर्फर्स देशाचे नाव उज्ज्वल करतील. काही उदयोन्मुख खेळाडू चमकदार कामगिरी करीत आहेत, असे सांगताना आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत विंडसर्फिंगमध्ये गोव्याला पदक निश्चित असेल, असा विश्वास माजी राष्ट्रीय चॅम्पियन डेरिक मिनेझिस यांनी व्यक्त केला.दहा वेळा राष्ट्रीय विजेते ठरलेले डेरिक यांचे नाव राज्य संघाचे प्रशिक्षक म्हणून आघाडीवर आहे. ते सुद्धा राज्याचा संघ तयार करण्यास उत्सुक आहेत. डेरिक यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, कात्या आणि ड्वेन कुएलो या भावंडांनी राष्ट्रीय पातळीवर चमक दाखवली आहे. नुकतीच आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणारी ही गोमंतकीय जोडी  पहिलीच होती. अनुभव कमी असल्याने अपेक्षित निकाल मिळाला नाही. परंतु, आशियाई पातळीपर्यंत झेप घेणे ही सुद्धा मोठी कामगिरी असते. या दोघांसोबत इतरही चांगले खेळाडू गोमंत भूमीत आहेत. गोवा आणि समुद्राचे अतूट नाते असल्याने या भूमीत चांगले विंडसर्फर घडलेले आहेत. त्यात रौनक पै, रसेल लोबो, कियोना राजानी, एविलीओ फर्नांडिस यांचा समावेश आहे. विंडसर्फिंग आणि सेलिंगसाठी सर्वात अडचणीचे असते ते म्हणजे साधने. ही साधने उपलब्ध झाल्यास खेळाडूंना तयार करण्यास सोपे जाईल. कारण या खेळातही आता मोठे तांत्रिक बदल झाले आहेत. त्यामुळे सरकारकडून मदत मिळेल, अशी अपेक्षा करतो. माझ्यावर राज्य संघाला तयार करण्याची जबाबदारी दिल्यास ती मी माझ्यापरीने उत्कृष्टरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करीन. प्रशिक्षक म्हणून मलाही सुद्धा त्याचा अभिमान वाटेल, असेही डेरिक यांनी सांगतले.दुसरीकडे, डेरिक यांचे नाव प्रशिक्षकपदासाठी आघाडीवर असल्याचे गोवा यॉटिंग असोसिएशन अध्यक्ष सिद्धार्थ सातर्डेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, की डेरिक यांच्यासारखे अनुभवी प्रशिक्षक गोव्यात असणे म्हणजे भाग्यच. त्यांनी नौसेना आणि भारतीय सेना यांच्या संघांना प्रशिक्षित केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय सेनेने २०१६ मध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक पटकाविले होते.ते स्वत: दहा वेळचे राष्ट्रीय चॅम्पियन आहेत. निश्चितच, त्याचे मार्गदर्शन खेळाडूंना मौल्यवान ठरेल. परंतु, खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या निवडीसाठी गोवा क्रीडा प्राधिकरणा आणि क्रीडा संचालनालया यांच्याकडून प्रक्रीय जलद व्हायला हवी. खेळाडूंना लवकर साधने उपल्ध झाल्यास त्यांचे सराव शिबिर लवकर सुरु करता येईल.

टॅग्स :goaगोवा