ग्लास्गो : भारताच्या सुखेन डेने गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या पुरुषांच्या भारोत्ताेलनमध्ये 56 किलो गटात 248 किलो वजन उचलून 20 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. शुक्रवारी झालेल्या महिलांच्या नेमबाजी प्रकारात 1क् मीटर एअर पिस्टल प्रकारात भारताच्या माईका गोयलने अचूक नेम साधून रौप्यपदक हस्तगत केले. भारताच्या गणोश माळीने मात्र कांस्यपदक जिंकले. महिलांच्या नेमबाजी प्रकारात गेल्या नोव्हेंबरमध्ये म्युनिक येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी करणा:या भारताच्या हिना सिद्धूने निराशा केली. तिला 95.8 गुणांसह सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेचा पहिला दिवस गाजविला होता भारोत्ताेलन आणि ज्युदो खेळाडूंनी. खुमुकचाम संजीता चानू, सेखोम मीराबाई, नवज्योत चाना, सुशील लिक्मबमला, कल्पना थोडमनंतर गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या पुरुषांच्या भारोत्ताेलन प्रकारात सुखेनने स्नॅचमध्ये 1क्9, तर क्लीन अॅन्ड जर्कमध्ये 139 असे एकूण 248 किलो भारताला दुसरे सुवर्ण जिंकून दिले.
महिलांच्या नेमबाजीत दहा मीटर एअर पिस्टल प्रकाराच्या अंतिम फेरीत भारताच्या मलाईकाने उत्कृष्ट प्रदर्शन करून 197.1 गुण संपादन करून रौप्यपदक हस्तगत केले. या प्रकारात सिंगापूरच्या शुन झी तियाने 198.6, तर कॅनेडाच्या डोरोथी लुडविगने 177.2 गुण मिळून अनुक्रमे सुवर्ण व कांस्यपदक जिंकले.
भारताच्या गणोश माळीला मात्र कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. गणोशने स्नॅचमध्ये 111 किलो, तर क्लीन अॅन्ड जर्कमध्ये
133 असे एकूण 244 किलो वजन उचलले. मलेशियाच्या जुल्हेमी पिसोलने एकूण 245 किलो वजन (स्नॅच 1क्8 तर क्लीन अॅन्ड जर्क 137) उचलून रौप्यपदक जिंकले.
बॅडमिंटनमध्ये युगांडाविरुद्ध 5-क् ने क्लिन स्वीप
घाना संघाचा दारुण पराभव केल्यानंतर भारतीय बॅडमिंटन संघाने गुरुवारी रात्री ब गटात युगांडा संघाचा 5-क् गेमने धुव्वा उडविला. भारताच्या आर. एम. व्ही. गुरुसाईदत्त आणि पी. व्ही. सिंधूने मिश्र दुहेरीच्या पहिल्या लढतीत युगांडाच्या विल्सन ट्रकायर आणि डेजी नाकाल्यांगो जोडीला 19 मिनिटांत 21-4, 21-6 असे पराभूत करून आपल्या संघाला 1-क् अशी आघाडी मिळून दिली. पुरुष एकेरीच्या दुस:या सामन्यात श्रीकांत किदाम्बीने युगांडाच्या एडविन एकिरिंगला 23 मिनिट 21=1क्, 21-8 असे नमविले. महिला एकेरीच्या तिस:या लढतीत 23 वर्षीय पी. सी. तुलसीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून 27 वर्षीय मार्गेट नानकाबिरव्हाला अवघ्या 16 मिनिटांत 21-3, 21-1 असे पराभूत केले. पुरुषांच्या दुहेरीत भारताच्या अक्षय देवलकर आणि प्रणव चोपडा या जोडीने एडविन एकिरिंग आणि विल्सन टुकायर जोडीचा 21-6, 21-8 असे पराभव केला. पाचव्या आणि शेवटच्या महिलांच्या दुहेरीत ज्वाला व अश्विनी या अव्वल जोडीने मार्गेट व डेजी यांनी 21-4, 21-8 गुणांनी नमविले.