शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

२०११ मध्ये सोनेरी स्वप्नाची पुनरावृत्ती

By admin | Published: February 14, 2015 11:04 AM

२०११ मध्ये सचिन तेंडुलकरचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले ते महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या भारतीय संघाने.

स्वदेश घाणेकर, मुंबई

‘त्याने कधी १०० शतकं बनविण्याचा विचार केला नाही... १०,००० हून अधिक धावा करण्याचेही त्याच्या ध्यानी मनी नव्हते... त्याचे केवळ एकच स्वप्न होते आणि ते म्हणजे भारताला विश्वचषक जिंकून देण्याचे...’ २०११ मध्ये सचिन तेंडुलकरचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले ते महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या भारतीय संघाने. प्रदीर्घ कारकिर्दीत सचिनला एकही विश्वचषक जिंकता न येणे, ही त्याच्या चाहत्यांना आणि त्याला गुरू मानणाऱ्या भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला अमान्य होती. त्यामुळे संघातील प्रत्येक खेळाडूने २०११चा विश्वचषक जिंकण्यासाठी जंग जंग पछाडले. सचिनला गुरू मारणारा एकलव्य युवराज सिंह याने कॅन्सर असूनही गुरूचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेली खेळी ही अतुलनीयच होती. याच अतुलनीय कामगिरीच्या बळावर २८ वर्षांनंतर भारताने विश्वचषक उंचावला. फॉर्मात असलेल्या युवीला मागे टाकून धोनीचे वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येणे... अप्रतीम खेळ करून त्याने खेचलेला तो विजयी षटकार आणि युवीचे त्याला मिठी मारून ढसाढसा रडणे... पॅव्हेलियनमधून खेळाडूंनी उडी मारून मैदानाकडे घेतलेली धाव व सचिनला खांद्यावर घेत हरभजन सिंग व विराट कोहली यांनी स्टेडियमवर काढलेली मिरवणूक... हे सारे आजही आपल्यासमोर आहे. चला मग या प्रवासवाटेच्या पाऊलखुणांवर पुन्हा एकदा चालूया...१९ फेब्रुवारी २०११ : वीरेंद्र सेहवाग आणि विराट कोहली यांच्या शतकी खेळीने भारताने मिरपूर येथे खेळविलेल्या पहिल्याच सामन्यात बांगलादेशसमोर ३७० धावांचा डोंगर उभा केला. भारताने जिंकलेल्या या लढतीत बांगलादेशने कडवा संघर्ष करत ९ बाद २८३ धावांची अनपेक्षित झेप घेतली. २७ फेब्रुवारी २०११ : शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत उत्सुकता शिगेला पोहोचवणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या लढतीत भारताला बरोबरी राखण्यात यश मिळाले. विजयासाठी पाच धावांची आवश्यकता असताना मुनाफने मात्र चतुराईने गोलंदाजी करून अखेरच्या तीन चेंडूंत केवळ चार धावा दिल्या आणि सामना बरोबरीत सुटला. ६ मार्च २०११ : आयर्लंडचा कर्णधार पोर्टेफिल्ड (७५) आणि नील ओब्रायन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी करून संघाला २०७ धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला. युवराजच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने ५ विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य ४६ षटकांतच पूर्ण केले. ९ मार्च २०११ : झहीर खान, युवराज सिंग आणि पीयूष चावला यांनी अप्रतीम गोलंदाजी करून नेदरलँडची अवस्था ६ बाद १०८ धावा अशी केली, मात्र, दयनीय अवस्थेत कर्णधार पीटर बोरेन याने ३८ धावा चोपून संघाला १८९ धावांची मजल मारून दिली. हा सामनाही भारताने जिंकला.१२ मार्च २०११ : द. आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात सचिन तेंडुलकरने कारकिर्दीतले ९९वे शतक झळकावले. सचिनच्या शतकी खेळीला वीरेंद्र सेहवागची (६६ चेंडूंत ७३ धावा) साथ मिळाल्याने भारताने पहिल्या विकेटसाठी १४२ धावांची भागीदारी केली. मात्र, डेल स्टेन (५-५०) आणि रॉबीन पीटरसन (२-५२) यांच्या स्पेलने भारताचा संपूर्ण डाव ४८.४ षटकांत २९६ धावांतच गडगडला. जॅक कॅलिस, हाशिम आमला आणि एबी डिव्हीलियर्स, डू-प्लेसिस, जोहान बोथा आणि रॉबीन पीटरसन यांनी तडाखेबाज खेळी करून भारताला पराभवाची चव चाखवली.२० मार्च २०११ : युवीने १२३ चेंडूंत ११३ धावा चोपून विराट कोहलीसह (५९) तिसऱ्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी करून संघाला २६८ धावांची मजल मारून दिली. या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचा डाव १८८ धावांवरच कोसळला. २४ मार्च २०११ : उपांत्यपूर्व फेरीच्या या लढतीत आॅस्ट्रेलिया संघाचे आव्हान होते. आऊट आॅफ फॉर्म असलेल्या रिकी पाँटिंगला नेमका याच लढतीत सूर गवसला आणि त्याच्या १०४ धावांच्या खेळीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने २६१ धावांचे लक्ष्य उभे केले. हे लक्ष्य ४८व्या षटकांतच पूर्ण करीत भारताने आॅस्ट्रेलियाचे वर्चस्व मोडले. ३० मार्च २०११ : मोहालीचे स्टेडियम खचाखच भरले होते... या हाय व्होल्टेज सामन्यात इतिहासाचा दाखला देत भारत बाजी मारणार हे निश्चित मानले जात होते. झालेही तसेच, परंतु पाकिस्तानच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे ही लढत भारताच्या पारड्यात पडली. सचिन तेंडुलकरला जवळपास पाच जीवदान देऊन पाकने स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला. सचिनने ११५ चेंडूंत ८५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून संघाला ९ बाद २६० धावांची मजल मारून दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकने चांगली सुरुवात केली खरी; परंतु त्यांना सातत्य राखण्यात अपयश आले. कर्णधार मिसबाह उल हकने ७६ चेंडूंत ५६ धावा करून एकाकी झुंज दिली. मात्र, संथ खेळीमुळे त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका झाली. पाकला हा सामना २९ धावांनी गमवावा लागला. २ एप्रिल २०११ : हा दिवस भारतीय इतिहासातील न विसरणारा दिवस ठरला आहे. १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांनी लॉर्डच्या त्या बाल्कनीत संघसहकाऱ्यांसोबत विश्वचषक उंचावला होता. त्याच क्षणाची पुनरावृत्ती महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०११मध्ये केली. प्रत्येक क्षणाला ज्याने भारताला विश्वचषक जिंकून देण्याचे स्वप्न पाहिले अशा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी हा अविस्मरणीय क्षण होता. वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिलकरत्ने दिलशान आणि कुमार संगकारा यांनी संघाला मजबुती मिळवून दिली. त्यांच्या या पायावर माहेला जयवर्धने याने १०३ धावांची भक्कम इमारत उभी केली आणि संघाला २७५ धावांचा पल्ला उभा करून दिला. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सचिन तेंडुलकरला घरच्या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. ‘सचिन... सचिन’ या जयघोषाने स्टेडियम दुमदुमले. मात्र, सातव्याच षटकांत स्टेडियम निशब्द झाले. लसिथ मलिंगाने सचिनला बाद करून भारताला धक्का दिला. २००३ नंतर पुन्हा विश्वचषक जिंकण्याची चालून आलेली संधी हुकते की काय असे चित्र चटकन डोळ््यांसमोर उभे राहिले. मात्र, गौतम गंभीर आणि विराट कोहलीच्या पक्क्या निर्धाराने भारताला पुन्हा विजयी ट्रॅकवर आणले. ३५ धावांवर विराट माघारी परतल्यानंतर स्टार युवी उतरेल असे वाटत असताना महेंद्रसिंग धोनी मैदानावर आला. अचानक फलंदाजीचा क्रम बदलल्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले तरी, विजय आपलाच हा निर्धार या निर्णयाने पक्का झाला होता. धोनीने ४९व्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर खणखणीत षट्कार खेचून भारताला विश्वजेतेपदाचा मान मिळवून दिला. धोनीचा तो षट्कार प्रेक्षकांमध्ये जाताच फटाक्यांची आतषबाजी झाली आणि युवीने गुरू सचिनला अनमोल गुरुदक्षिणाच दिली. सोनेरी स्वप्नाची पुनरावृत्ती झाली.

अखेर स्वप्न पूर्ण झाले

२१ वर्षांच्या कारकिर्दीत सचिनने सहा विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेतला; परंतु जेतेपद पटकावता न आल्याची खंत त्याला सतावत होती. २००३ साली जेतेपदाच्या अगदी जवळ जाऊन भारताला परतावे लागले होते. २०१५च्या विश्वचषक स्पर्धेत सचिनचे खेळणे अशक्य असल्यामुळे त्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी २०११च्या स्पर्धेतच संधी होती. संघसहकाऱ्यांनी या महान फलंदाजाला भेट म्हणून विश्वचषक जिंकण्याचा संकल्प सोडला होता. त्यामुळे हा विजय साकार झाला. या विजयानंतर सचिन म्हणाला होता की, याहून अधिक मला काहीच नको. विश्वचषक जिंकणे, हा दिवस माझ्या आयुष्यातील अभिमानाचा दिवस आहे. सर्व संघ सहकाऱ्यांचे आभार, त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हते. मी आनंदाश्रूवर आवर घालू शकत नाही. हा विजय प्रत्येक भारतीयांना समर्पित. हा माझा पहिला विश्वचषक आहे आणि याहून अधिक मला काहीच नको.