शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
2
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
3
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
4
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
5
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
6
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
7
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
8
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
9
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
10
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार
11
'सिंघम अगेन'च्या शेवटी मिळालं खास सरप्राइज! सलमान खानच्या एन्ट्रीने झाली नव्या सिनेमाची घोषणा
12
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
13
'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी
14
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
15
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
16
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
17
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
18
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
19
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
20
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

पॅराजम्पर शीतलाला इजिप्तमध्ये सुवर्ण प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 3:38 AM

पॅराजम्पिंग या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध रेकॉर्ड बनवून देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या पद्मश्री शीतल महाजन हिला फेडरेशन आॅफ एरोनॉटिकल इंटरनॅशनलच्या (एफएआय) वतीने इजिप्त येथे उल्लेखनीय कामगिरीसाठी सुवर्ण पदक प्रदान करुन गुरुवारी सन्मानित केले.

मुंबई : पॅराजम्पिंग या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध रेकॉर्ड बनवून देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या पद्मश्री शीतल महाजन हिला फेडरेशन आॅफ एरोनॉटिकल इंटरनॅशनलच्या (एफएआय) वतीने इजिप्त येथे उल्लेखनीय कामगिरीसाठी सुवर्ण पदक प्रदान करुन गुरुवारी सन्मानित केले.‘एफएआय’ ही संस्था जागतिक स्तरावर आकाशातील सर्व खेळांचे नियमन करणारी सर्वोच्च संस्था आहे. शीतलने यंदा एकाच वर्षात सहा खंडांंमध्ये स्काय डाइव्ह करण्याचा पराक्रम केला. या साहसी कामगिरीसाठी शीतलला ‘सबिहा गोकसन सुवर्ण पदक’ प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार पटकावणारी शीतल पहिली भारतीय महिला ठरली. तसेच एका वर्षात जगातील सहा खंडात स्काय डायविंग करणारी ती प्रथम महिला असून हा तिचा एकूण सहावा जागतिक विक्रम आहे.यापूर्वी भारतातील जे.डी.आर टाटा (१९८४) यांना द एफएआय गोल्ड एअर मेडल, एफएआय कांस्य पदक अतुल देव (१९९६), द पॉल तिसदीर डिप्लोमा पुरस्कार विश्वबंधु गुप्ता (१९८५), कॅप्टन सतीश शर्मा (१९८५), एफ. एच. इराणी (१९५८), आर. के. वासन (१९८९), द एफएआय एअर स्पोर्ट मेडल पुरस्कार अतुल देव (१९९४) व दी मंगोलफिर बल्लूनिंग डिप्लोमा पुरस्कार विजयपत सिंघनिया (२००६) या आठ भारतीयांना एफएआयने गौरविले आहे.>एफएआय संस्था वर्ल्ड ऐरो-स्पोर्ट्स चॅम्पियनशिप आणि जागतिक स्कायडायविंग स्पर्धांचे आयोजन करते. तसेच, पराग्लायडिंग आणि हॉट एअर बलूनसह एकूण १४ ऐरो क्रीडाप्रकारांचे आयोजनही करते.>मी हा पुरस्कार स्विकारण्यासाठी अमेरिकेतून आली. कारण तेथे मी एक स्पर्धेसाठी गेली होती. पण येथे येण्यासाठी मला आर्थिक चणचण भासली. अमेरिकेतील स्पर्धेसाठी माझ्या पालकांनी ४ लाख रुपयांचे कर्ज काढले. मला या खेळासाठी सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. या साहसी खेळाकडे सरकारने लक्ष द्यावे हीच माझी अपेक्षा आहे.- शीतल महाजन