शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

‘सुवर्ण’ पाऊस कायम

By admin | Published: February 13, 2016 1:31 AM

१२व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदकांचा पाऊस पाडताना लांब पल्ल्याची धावपटू कविता राऊतने रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली.

गुवाहाटी : १२व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदकांचा पाऊस पाडताना लांब पल्ल्याची धावपटू कविता राऊतने रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली. भारताने पदक तालिकेतील अव्वल स्थान मजबूत केले आहे. भारताने या स्पर्धेत १४६ सुवर्ण, ७९ रौप्य आणि २३ कांस्यपदकांसह एकूण २४८ पदकांची कमाई केली. दुसऱ्या स्थानावरील श्रीलंका भारताच्या तुलनेत बरीच पिछाडीवर आहे. श्रीलंकेने १५७ पदकांची कमाई केली आहे. त्यात २५ सुवर्ण, ५३ रौप्य आणि ७९ कांस्यपदकांचा समावेश आहे. पाकिस्तानाने ७ सुवर्ण, २३ रौप्य व ४३ कांस्यपदकांसह एकूण ७३ पदकांची कमाई करीत तिसरे स्थान पटकावले आहे. अ‍ॅथलेटिक्समध्ये शुक्रवारी अखेरच्या दिवशी कविताने २ तास ३९ मिनिटे आणि ३८ सेंकद वेळेसह या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेली ती चौथी भारतीय धावपटू ठरली. ओपी जैशा, ललिता बाबर व सुधा सिंग यांनी यापूर्वीच रिओ आॅलिम्पिक तिकीट पक्के केले आहे. आॅलिम्पिक मॅरेथॉनची पात्रता वेळ २ तास ४२ मिनिटांची होती. श्रीलंकेच्या एन.जी. राजशेखराने रौप्य तर बी. अनुराधीने कांस्यपदक पटकावले. नाशिकची कविता सॅग स्पर्धेच्या माध्यमातून आॅलिम्पिक पात्रता मिळवणारी एकमेव धावपटू आहे. पुरुषांच्या स्पर्धेत फिनिशिंगबाबत संभ्रम होता. तांत्रिक समितीच्या एका सदस्याने सांगितले की, ‘रावत व कुरे यांना फिनिशिंग लाइनबाबत पुरेशी माहिती नव्हती. स्टेडियममध्ये एक लॅपनंतर शर्यत संपणार असल्याची त्यांची समज होती. त्यामुळे सुवर्ण व रौप्यपदक विजेत्या खेळाडूंच्या टायमिंगमध्ये एका सेकंदाचा फरक होता. कुरे रौप्य तर खेता राम कांस्यपदकाचा मानकरी ठरला. रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणारे अन्य खेळाडू नितेंद्र सिंग रावतने पुरुष मॅरेथॉनमध्ये २ तास १३ मिनिटे १८ सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले. त्याने श्रीलंकेच्या कुरे अनुराधा इंद्रजीतला एक सेकंद वेळेने पिछाडीवर सोडले. गतविजेत्या बलाढ्य भारताने पुरुष गटात विजयी सुरुवात करताना कबड्डीचीत भक्कम आगेकूच केली. सलामीला अफगाणिस्तान संघ अनुपस्थित राहिल्यानंतर भारताला विजयी घोषित करण्यात आले. भारताच्या महिलांनीही सलग दुसरा विजय मिळवला. पुरुषांनी नेपाळला ४८ - २३ असे लोळवले.मध्यांतराला भारताने १९-१२ अशी आघाडी घेतल्यानंतर आपला हिसका दाखवत नेपाळला कबड्डीचे धडे दिले. तर यानंतर भारताने श्रीलंकेचे आव्हान ३५ - २१ असे परतावून दुसरा विजय नोंदवला. दोन्ही सामन्यांत राहुल चौधरीने निर्णायक अष्टपैलू खेळ केला. तर काशिलिंग आडके व कर्णधार अनुप कुमार यांनी आक्रमक व खोलवर चढाया करताना राहुलला चांगली साथ दिली. भारताच्या महिलांनी दुसरा विजय मिळवताना श्रीलंकेचा ३७-१३ असा फडशा पाडला. मध्यांतराला १८-७ अशी एकतर्फी आघाडी घेतली होती. (वृत्तसंस्था)चैनचा सुवर्णवेध, नारंगला कांस्यनेमबाजीमध्ये चैन सिंगने वैयक्तिक दुसरे सुवर्णपदक पटकावताना भारताचा बलाढ्य गगन नारंगला मागे टाकण्याची किमया केली. भारताने शुक्रवारी चारही सुवर्णपदके पटकावली. २६वर्षीय चैन सिंगने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये त्याचा सिनिअर सहकारी गगन नारंगला पिछाडीवर सोडताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. कालिपारा शूटिंग रेंजमध्ये गुरुवारी ५० मीटर रायफल प्रोनमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या चैनने २०४.६ असा स्कोअर नोंदवला. गगनने २०१२च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये या प्रकारात कांस्यपदक पटकावले होते. येथेही त्याला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले. ५० मीटर प्रोनमध्येही त्याला चैनकडून पराभव स्वीकारावा लागला. बांगलादेशच्या मोहम्मद सोवोन चौधरीने २०३.६ गुणांसह रौप्यपदक पटकावले. चैन, नारंग व इम्रान खान या भारतीय त्रिमूर्तीने १० मीटर एअर रायफल स्पर्धेत १८६३.४चा स्कोअर नोंदवताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. बांगालदेशने रौप्य तर श्रीलंकेने कांस्यपदक पटकावले.