शिवाजी गोरे / ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. २१ : आॅलिम्पिकमध्ये एकशे बारा वर्षानंतर समावेश झालेल्या गोल्फ खेळात भारताची १८ वर्षीय अदिती अशोकला फाईव्ह ओव्हार ७६ गुणांची खेळी करून ४१ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या खेळासाठी विविध देशांच्या संघांमधून एकूण ६४ तर जगातील सर्वोत्कृष्ट १० गोल्फपटू सहभागी झाले होते.
रियोमार येथिल आॅलिम्पिक गोल्फ कोर्सवर घालेल्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अदिती पहिल्या सात क्रमांकावर होती, त्यावेळी तीने गुण ६८-६८ असे होते. तिसऱ्या दिवशी तीला आपल्या खेळात सातत्य राखता न आल्यामुळे तील ७९ गुणांवर समाधान मानावे लागले. चौथ्या दिवशी तीला सुरू न गवसल्यामुळे ७६ गुणांवर समाधान मानवे लागले. तीला यावेळी एकही बर्डी खेळता आली नाही. फक्त तीन बोगीज आणि एक डबल बोगीची खेळी तीने केल्यामुळे सेव्हन ओव्हर २९१ गुणांवर समाधान मानावे लागले.