शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

‘दिलस्कूप’च्या जन्मदात्याने घेतला निरोप

By admin | Published: September 10, 2016 3:48 AM

श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू तिलकरत्ने दिलशान आपल्या कारकिर्दीतील अखेरच्या डावात अवघ्या एक धाव काढून बाद झाला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला हटके असा ‘दिलस्कूप’ फटक्याची भेट देणारा आणि श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू तिलकरत्ने दिलशान आपल्या कारकिर्दीतील अखेरच्या डावात अवघ्या एक धाव काढून बाद झाला. मात्र, यावेळी संघसहकाऱ्यांनी गार्ड आॅफ आॅनर सादर करत दिलशानला भावूक निरोप दिला.आॅस्टे्रलियाविरुध्द शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात जेव्हा दिलशान फलंदाजीला उतरला तेव्हा, श्रीलंकाई खेळाडूंनी बॅट हवेत उंचावून दिलशानला ‘गार्ड आॅफ आॅनर’ दिला. मात्र, दिलशानची अखेरची खेळी अपयशी ठरली. आपल्या अखेरच्या खेळीत ३ चेंडूत केवळ एक धावा काढण्यात दिलशानला यश आले. जॉन हेस्टिग्सच्या चेंडूवर डेव्हीड वॉर्नरकडे झेल देऊन दिलशान माघारी परतला.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हटके आणि आकर्षक असा ‘दिलस्कूप’ शॉटचा जन्मदाता असलेल्या दिलशानचा हा ४९७ वा आंतरराष्ट्रीय सामना होता. १९९९ साली सनथ जयसूर्याच्या नेतृत्त्वाखाली दिलशानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.दिलशानने मार्च २०१३ साली कोलंबो येथे बांगलादेशविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला. तसेच, नुकताच २८ आॅगस्टला दाम्बुला येथे आॅस्टे्रलियाविरुद्ध अखेरचा एकदिवसीय सामना खेळला. दिलशानने ८७ कसोटी सामन्यांत ५४९२ धावा काढल्या असून ३३० एकदिवसीय सामन्यांत १० हजार २९० धावा केल्या आहेत. तर, ८० टी२० सामने खेळताना त्याने १८८९ धावा काढल्या आहेत.>क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये दिलशानचे योगदान शानदार आहे. त्याने बलाढ्य फलंदाज म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. परंतु, नंतर खेळाच्या व संघाच्या आवश्यकतेनुसार दिलशानने आपल्या खेळामध्ये बदल केला. मार्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दिलशानने सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आयसीसीच्या वतीने दिलशानचे त्याच्या शानदार कारकिर्दीसाठी अभिनंदन करतो तसेच पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो. - डेव्हीड रिचर्डसन, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयसीसी