ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. : पुढच्या आॅलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळविण्यासाठी गोपीचंद यांच्यापेक्षा चांगला कोच नियुक्त करण्याच्या एका मंत्र्यांच्या वक्तव्यावर आॅलिम्पिक रौप्य विजेती पी.व्ही. सिंधू हिने पुलेला गोपीचंद हेच माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट कोच असल्याचे स्पष्ट केले. याप्रकरणी मी अधिक काही बोलू इच्छित नाही पण गोपीचंद हेच माझ्यासाठीसर्वोत्कृष्ट कोच असून मला विदेशी कोचची गरज नाही, असे सिंधू म्हणाली.
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ती पुढे म्हणाली,ह्यमाझ्यासाठी गोपीसर सर्वोत्कृष्ट कोच आहेत. मंत्र्यांनी जे काही वक्तव्य केले त्यावर मला भाष्य करायचे नाही. तेलंगणाचे उपमुख्यमंत्री महमूद अली यांनी सिंधूच्या सत्कार सोहळ्यात व्यासपीठावरून बोलताना सिंधूला आणखी तयारी करता यावी तसेच पुढील आॅलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकता यावे यासाठी गोपीचंदपेक्षा सरस कोच उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती.
विशेष असे की त्यावेळी गोपीचंद हे व्यासपीठावर उपस्थित होते. रिओमध्ये अंतिम सामन्यात सिंधू स्पेनची कॅरोलिना मारिन हिच्याकडून पराभूत झाल्याने तिला रौप्यावर समाधान मानावे लागले.
सिंधू म्हणाली, माझ्या विजयाचा जल्लोष सातत्याने सुरू असल्याचे पाहून आनंद झाला. मी तेलंगणा तसेच आंध्र सरकारची आभारी आहे.ह्ण राष्ट्रीय कोच गोपीचंद यांनी देशाला आॅलिम्पिकमध्ये अधिक पदके जिंकायची झाल्यास संपूर्णप्रणालीत सुधारणा करावी लागेल, यावर भर दिला. आमच्याकडे प्रणालीत आमूलाग्र सुधारणेची गरज आहे. देशाला आणखी पदके जिंकायची झाल्यास पायाभूत व्यवस्था बदलावीच लागेल, असे गोपीचंद यांचे मत आहे