शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

सरकार अनुदान देत नाही - आयओए

By admin | Published: January 02, 2016 8:34 AM

भारतीय आॅलिम्पिक संघटनेला (आयओए) अनुदान देत असल्याचा केंद्र सरकारचा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याची प्रतिक्रिया देशातील क्रीडा संस्थांचे संचालन

नवी दिल्ली : भारतीय आॅलिम्पिक संघटनेला (आयओए) अनुदान देत असल्याचा केंद्र सरकारचा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याची प्रतिक्रिया देशातील क्रीडा संस्थांचे संचालन करणाऱ्या या सर्वोच्च संस्थेने व्यक्त केली. जो निधी दिला जातो तो मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंवर खर्च करण्यासाठी असल्याचा आयओएचा दावा आहे.क्रीडा मंत्रालय सहसा आयओएला अनुदान देत नाही. पण आॅलिम्पिक, आशियाई तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय पथकाला दिला जाणारा किट तसेच खेळाडूंच्या निवासाचा खर्च यासाठी निधी उपलब्ध होतो. मंत्रालयाने २२ डिसेंबरला प्रसिद्ध केलेल्या पत्रात २०१२-१३मध्ये आयओएला अनुदान स्वरूपात २,२८,४८,५२४ रुपये तसेच २०१४-१५ या वर्षांत १६,९३,४४,३५९ रुपये उपलब्ध केल्याचे म्हटले होते. सरकार अनुदान देत असल्याने क्रीडा महासंघांवर आचारसंहिता लागू करण्याची सक्ती करू शकतो, असे मंत्रालयाने न्यायालयात म्हटल्याकडे आयओएने लक्ष वेधले आहे. यापुढे खेळाडूंवर होणारा खर्च आयओएमार्फत नव्हे, तर खेळाडूंना परस्पर द्यायला सांगण्याबाबत आयओए विचार करीत आहे. आयओए महासचिव राजीव मेहता म्हणाले, ‘ही दिशाभूल आहे. मंत्रालय शासकीय दस्तावेजांमध्ये जे अनुदान दाखवित आहे ते प्रत्यक्षात खेळाडूंवर व आयोजनावर झालेला खर्च आहे. आयओएला अनुदान म्हणून ही रक्कम देण्यात आली असे कसे म्हणता येईल. आयओएला मंत्रालय एकही रुपया देत नाही. टेनिस व ज्युडोला धमकीसरकार व आयओए यांच्यातील बेबनावामागील खरे कारण क्रीडा संहितेचे निर्देश आहेत. सरकारने क्रीडा संहितेअंतर्गत अ.भा. टेनिस संघटना आणि भारतीय ज्युडो महासंघाला मान्यता रद्द करण्याची धमकी दिली आहे. एआयटीए व जेएफआयचे अध्यक्ष अनिल खन्ना व मुकेश कुमार यांची अध्यक्षपदी निवड वैध नसल्याचेही क्रीडा मंत्रालयाचे म्हणणे आहे.