दुबई :भारताविरुद्ध कसोटी मालिकेत निराशाजनक प्रदर्शनानंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ नाराज आहे. त्याने पुनरागमनाचे संकेत देऊन धक्का दिला. ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेला ३-० अशा क्लीन स्विपचा सामना करावा लागला. मास्टर्स चॅम्पियन्स लीगमध्ये (एमसीएल) सुपर किंग्ज संघाकडून खेळणाऱ्या स्मिथने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्यात त्याने एमसीएलमध्ये खेळणे हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुनरागमनाचा मार्ग ठरू शकतो, असे म्हटले आहे.मला वारंवार विचारले जाते आणि हा प्रश्न मनात राहतो. संघ निराशाजनक प्रदर्शन करतो त्या वेळी मी योगदान देऊ शकतो, असे वाटते. सध्या मी एमसीएलची तयारी करीत आहे. ३३ वर्षांचा असताना निवृत्ती घेतली होती. अजून क्रिकेट शिल्लक आहे. तीन-चार वर्षे खेळू शकतोस काय? यावर स्मिथने सकारात्मक मान डोलावली.
ग्रॅमी स्मिथचे पुनरागमनाचे संकेत
By admin | Published: December 08, 2015 11:49 PM