शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
2
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
3
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
4
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
5
घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
6
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
7
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
8
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
9
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
10
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
11
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
12
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
13
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
14
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
15
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
16
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
17
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
18
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
19
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
20
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी

न्यूझीलंडची शानदार सुरुवात

By admin | Published: September 24, 2016 5:11 AM

भारतीय गोलंदाजांनी शुक्रवारी दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बळी घेण्यासाठी कसून मेहनत घेतली

कानपूर : भारतीय गोलंदाजांनी शुक्रवारी दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बळी घेण्यासाठी कसून मेहनत घेतली, पण विलियम्सन, लॅथमच्या अभेद्य शतकी भागीदारीमुळे त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. पावसाच्या व्यत्ययामुळे अखेरच्या सत्राचा खेळ रद्द होण्यापूर्वी न्यूझीलंडने पहिल्या डावात १ बाद १५२ धावांची मजल मारली होती. त्याआधी, गुरुवारच्या ९ बाद २९१ धावसंख्येवरून पुढे खेळणाऱ्या भारताचा डाव शुक्रवारी सकाळच्या सत्रात ३१८ धावांत संपुष्टात आला. प्रत्युत्तरात खेळताना न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (नाबाद ६५) आणि सलामीवीर टॉम लॅथम (नाबाद ५६) यांनी अर्धशतके झळकावली. पावसामुळे तिसऱ्या सत्रात खेळ शक्य झाला नाही. न्यूझीलंडला भारताची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी अद्याप १६६ धावांची गरज असून त्यांच्या ९ विकेट शिल्लक आहेत. मैदानावर सुपर-सॉपरची व्यवस्था नसल्यामुळे खेळ पुन्हा सुरू झाला नाही. शुक्रवारच्या षटकांची भरपाई करण्यासाठी शनिवारी सकाळी खेळ ९.१५ वाजता प्रारंभ होणार असून दिवसभरात ९८ षटके टाकली जातील. भारतातर्फे एकमेव विकेट वेगवान गोलंदाज उमेश यादवने घेतली. त्याने मार्टिन गुप्तीलला (२१) पायचित बाद केले. विलियम्सन व लॅथम यांच्यावर एकाही भारतीय गोलंदाजाला वर्चस्व गाजवता आले नाही. चहापानाला काही षटकांचा अवधी शिल्लक असतानाचा अपवाद वगळता या जोडीला भारतीय गोलंदाजांविरुद्ध कुठलीच अडचण भासली नाही. हे फलंदाज दोनदा सुदैवी ठरले. प्रमुख गोलंदाज अपयशी ठरत असल्याचे बघितल्यानंतर कोहलीने कामचलाऊ गोलंदाज मुरली विजयकडे चेंडू सोपवला. विजयच्या फुलटॉस चेंडूवर फटका मारण्याच्या नादात लॅथमचा अंदाज चुकला आणि चेंडू पॅडवर आदळला. त्यावर भारतीय खेळाडूंनी केलेले पायचितचे अपील पंचानी फेटाळून लावले. त्यानंतरच्या पुढच्या षटकात जडेजाच्या उजव्या यष्टीबाहेरच्या चेंडूवर स्वीपचा फटका मारण्याच्या प्रयत्नात लॅथमचा उडालेला झेल फॉरवर्ड शॉर्टलेगवर तैनात क्षेत्ररक्षक लोकेश राहुलच्या हातात विसावला, पण टीव्ही पंचानी त्याला नाबाद ठरविले. कारण चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावण्यापूर्वी हेल्मेटच्या ग्रीलला चाटून गेला होता. लॅथमने त्यानंतरच्या षटकात अश्विनच्या गोलंदाजीवर कव्हर्समध्ये दोन धावा घेत कारकिर्दीतील आठवे अर्धशतक पूर्ण केले. तीन चेंडूंनंतर न्यूझीलंडचा कर्णधार विलियम्सननेही जडेजाच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत २३ वे अर्धशतक पूर्ण केले. त्याआधी, भारताने कालच्या ९ बाद २९१ धावसंख्येवरून डावाची सुरुवात केली. रवींद्र जडेजाने (नाबाद ४२) काही आकर्षक फटके लगावत भारताला ३०० चा पल्ला ओलंडून दिला. त्याने यादवसोबत (०९) अखेरच्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली. भारताने कालच्या धावसंख्येत २७ धावांची भर घातल्यानंतर यादव वेगवान गोलंदाज नील वॅगनरचे लक्ष्य ठरला. न्यूझीलंडच्या डावातील तिसऱ्या षटकात कर्णधार कोहलीने जडेजाला गोलंदाजीसाठी पाचारण केले. एका षटकानंतर गोलंदाजीवर हटविण्यात आलेल्या यादवने नंतरच्या स्पेलमध्ये गुप्तीलला बाद करीत भारताला आजच्या दिवसातील एकमेव यश मिळवून दिले. त्यानंतर विलियम्सन व लॅथम यांनी सावध फलंदाजी केली. (वृत्तसंस्था)पावसाच्या व्यत्ययापूर्वी न्यूझीलंडतर्फे विलियम्सन व लॅथम यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११७ धावांची अभेद्य भागीदारी केली होती. विलियम्सनने ११५ चेंडूंना सामोरे जाताना ७ चौकारांच्या मदतीने ६५, तर लॅथमने १३७ चेंडूंना सामोरे जाताना ५ चौकारांच्या मदतीने ५६ धावा फटकावल्या आहेत. विलियम्सनने अश्विनविरुद्ध स्वीपच्या फटक्याचाही वापर केला. लॅथमने दोन्ही फिरकीपटू व वेगवान गोलंदाजांविरुद्ध संयमी फलंदाजी केली. विलियम्सन ३२ व्या षटकात अश्विनविरुद्ध स्वीपचा फटका खेळताना सुदैवी ठरला. त्यावेळी चेंडू त्याच्या हेल्मेटच्या मागच्या भागावर आदळला आणि फ्लॅप यष्टीवर आदळले, पण बेल्ट पडल्या नाहीत. त्यावेळी तो वैयक्तिक ३९ धावांवर होता.

धावफलकभारत पहिला डाव :- लोकेश राहुल झे. वॉटलिंग गो. सेंटनर ३२, मुरली विजय झे. वॉटलिंग गो. सोढी ६५, चेतेश्वर पुजारा झे. व गो. सेंटनर ६२, विटार कोहली झे. सोढी गो. वॅगनर ०९, अजिंक्य रहाणे झे. लॅथम गो. क्रेग १८, रोहित शर्मा झे. सोढी गो. सेंटनर ३५, रविचंद्रन अश्विन झे. टेलर गो. बोल्ट ४०, रिद्धिमान साहा त्रि. गो. बोल्ट ००, रवींद्र जडेजा नाबाद ४२, मोहम्मद शमी त्रि. गो. बोल्ट ००, उमेश यादव झे. वॉटलिंग गो. वॅगनर ०९. अवांतर (०६). एकूण ९७ षटकांत सर्वबाद ३१८. बाद क्रम : १-४२, २-१५४, ३-१६७, ४-१८५, ५-२०९, ६-२६१, ७-२६२, ८-२७३, ९-२७७, १०-३१८. गोलंदाजी : बोल्ट २०-३-६७-३, वॅगनर १५-४-४२-२, सँटनर २३-२-९४-३, क्रेग २४-६-५९१, सोढी १५-३-५०-१. >न्यूझीलंड पहिला डाव :- मार्टिन गुप्तील पायचित गो. उमेश यादव २१, टॉम लॅथम खेळत आहे ५६, क्रेग विलियम्सन खेळत ६६. अवांतर (०९). एकूण ४७ षटकांत १ बाद १५२. बाद क्रम : १-३५. गोलंदाजी : शमी ८-१-२६-०, यादव ७-२-२२-१, जडेजा १७-१-४७-०, अश्विन १४-१-४४-०, विजय १-०-५-०.