शहरं
Join us  
Trending Stories
1
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
2
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
3
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
5
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
6
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
7
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
8
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
9
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
10
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
11
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
12
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
13
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

By admin | Published: July 24, 2016 4:16 AM

आगामी ५ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेआधी देशामध्ये या खेळांविषयी उत्साह निर्माण होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ जुलैला दिल्ली येथे इंडिया गेटवर ‘रन फॉर रिओ’

नवी दिल्ली : आगामी ५ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेआधी देशामध्ये या खेळांविषयी उत्साह निर्माण होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ जुलैला दिल्ली येथे इंडिया गेटवर ‘रन फॉर रिओ’ उपक्रमाला हिरवा झेंडा दाखवतील.क्रीडामंत्री विजय गोयल यांनी शनिवारी येथे झालेल्या एका कार्यक्रमात याबद्दल माहिती देताना सांगितले, ‘‘आम्ही देशात आॅलिम्पिकबाबत उत्साह निर्माण करू इच्छितो. यामुळेच इंडिया गेट येथे ‘रन फॉर रिओ’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मी ज्या वेळी याबाबत मोदी यांना कल्पना दिली, तेव्हा त्यांनी स्वत:हून या कार्यक्रमाला हिरवा झेंडा दाखवण्याची इच्छा व्यक्त केली. या वेळी हजारो क्रीडाप्रेमी आॅलिम्पिक खेळाडूंना पाठिंबा दर्शवण्यासाठी धावतील.’’ विशेष म्हणजे एक आॅगस्टपासून सेंट्रल पार्क येथे भव्य स्क्रीन लावण्यात येणार आहे, ज्यावर आॅलिम्पिकचे थेट प्रसारण दाखवण्यात येईल. याविषयी गोयल म्हणाले, ‘‘सेंट्रल पार्क येथे तिरंग्याखाली मोठा स्क्रीन लावण्यात येणार असून याशिवाय येथे विजेंदरसिंगसह अन्य आॅलिम्पियन खेळाडूंचे कटआऊटही लावण्यात येतील.’’ (वृत्तसंस्था)सानियाची आई भारतीय पथकाची फिजिओ...आॅलिम्पिकमध्ये महिला मल्लांसह महिला फिजिओ म्हणून अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झाची आई नसीमा मिर्झा जाणार आहे. याबाबत क्रीडा सचिव राजीव यादव म्हणाले, ‘‘सानिया मिर्झाची आई नसीमा अन्य अधिकाऱ्यांसह महिला फिजिओ म्हणून भारतीय संघासोबत रिओला जाणार आहे. सानिया जगातील अव्वल टेनिसपटू असून नसीमाला तिच्यासह पाठवण्याची विनंती मान्य करण्यात आली आहे. तसेच नसीमा या महिला संघाच्या व्यवस्थापिकादेखील आहेत.’’