मुंबई : अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात गुजरात फॉर्च्युनजायंट्सने दिल्लीचा ३१-२६ असा पराभव करीत आपला विजयी रथ कायम ठेवला. या सत्रात दिल्लीचा हा पहिला पराभव ठरला, तर गुजरातने आपला सलग तिसरा विजय साकार केला. पहिल्या सत्रात ११-१४ ने पिछाडावर राहिलेल्या गुजरात फॉर्च्युनजायंट्सने दुसऱ्या सत्रात आपला खेळ उचांवत आक्रमक खेळ करण्यावर भर दिला. गुजरातकडून जी. बी. मोरे याने अष्टपैलू कामगिरी करताना ९ गुणांची कमाई गेली. तर त्याला रोहीत गुलीया (८ गुण) चांगली साथ दिली.
दबंग दिल्ली कडून स्टार खेळाडू नवीन कुमारने १० गुणांची कमाई केली. त्याला इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही. दोन्ही संघ एकदा आॅल आऊट झाले. गुजरातने चढाई करताना १७ गुण मिळविले तर दिल्लीला १३ मिळवता आले. हा सामना अपेक्षेपेक्षा चुरशीचा झाला. गुजरातच्या धडाक्यापुढे दिल्लीचा टिकाव लागणार नाही असा कयास असताना दिल्लीच्या खेळाडूंनी गुजरातला चांगलीच लढत दिली. नवीनकुमारने गुजरातच्या बचावफळीच्या उणिवा उघड केल्या. सामन्याच्या शेवटच्या सात मिनिटापर्यंत सामना दोन्ही बाजूला झुकत होता. मात्र दिल्लीचा बचाव कमकुवत ठरल्याने गुजरातच्या खेळाडूंना त्याचा फायदा झाला.(वृत्तसंस्था)