शानदार गोलंदाज, कमालीचे सलामीवीर आणि उत्कृष्ट मिडल आॅर्डर याबाबतीत गुजरात लायन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात साम्य आहे. गुणतालिकेवरून ही बाब स्पष्ट होत नसेलही, पण हे सत्य आहे.गुजरातबाबत विचाराल तर गोलंदाजीत हा संघ बलाढ्य वाटतो. ब्राव्हो आणि जडेजा यष्टीवर अचूक मारा करतात. ब्राव्होकडे वेगळी कला आहे. त्याचे काही चेंडू यॉर्र्कर असतात. जडेजा पारंपरिक डावखुरा असल्याने वेगवान चेंडू टाकतो. खेळपट्टीने साथ दिल्यास त्याची फिरकी कमालीची भेदक बनते. याशिवाय फॉल्कनर, प्रवीण कुमार आणि प्रवीण तांबे हे गडी बाद करण्यात सक्षम आहेत.हैदराबादकडेदेखील उत्तम मारा करणारे गोलंदाज आहेत. भुवनेश्वर कुमार आणि बरिंदर सरन हे प्रभावी दिसले. आशिष नेहरा सध्या जखमी आहे. मुस्तफिझूर रहमान हा प्रतिभवान गोलंदाज या संघाला लाभला.सलामीवीरांबद्दल सांगायचे, तर हैदराबादसाठी वॉर्नर तर गुजरातसाठी फिंच ही भूमिका बजावतो. दोघांनाही चेंडू सीमापार पाठविणे आवडते. मधल्या फळीत मोर्गन हैदराबादसाठी, तर ब्राव्हो गुजरातसाठी सामना फिरविणारा खेळाडू आहे. मोर्गन चौफेर फटकेबाजीसाठी प्रख्यात आहे. ब्राव्होकडे तर शॉटची उणीव नाहीच. पण दोन्ही संघ फलंदाजीपेक्षा आपल्या गोलंदाजी क्षमतेवर विश्वास ठेवतात, असे आपण म्हणू शकतो. दोन्ही संघातील दोन फलंदाज फॉर्ममध्ये नाहीत. सुरेश रैना गुजरातकडून, तर शिखर धवन हैदराबादकडून लौकिकानुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहेत. हे दोन्ही संघ क्षमतेनुरूप खेळायला लागले, तर अन्य संघांना सावध रहाण्याशिवाय पर्याय उरणार नाही. (टीसीएम)
गुजरात-हैदराबाद साम्य
By admin | Published: April 21, 2016 4:13 AM