शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
2
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
3
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
5
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
6
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
7
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
8
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
9
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
10
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
11
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
12
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
13
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
14
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
15
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
16
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
17
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
18
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
19
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
20
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

गुप्तिलचा झंझावात, विंडीजचा सफाया

By admin | Published: March 22, 2015 1:21 AM

भेदक माऱ्याच्या बळावर न्यूझीलंडने विश्वचषकाच्या चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात शनिवारी वेस्ट इंडिजला १४३ धावांनी सहज पराभूत केले.

बाद फेरी : १४३ धावांनी विजयासह न्यूझीलंड सातव्यांदा अंतिम चारमध्येवेलिंग्टन : सलामीवीर मार्टिन गुप्तिलचे नाबाद द्विशतक (२३७ धावा) आणि ट्रेंट बोल्टच्या (४४ धावांत ४ बळी) भेदक माऱ्याच्या बळावर न्यूझीलंडने विश्वचषकाच्या चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात शनिवारी वेस्ट इंडिजला १४३ धावांनी सहज पराभूत केले. या विजयामुळे न्यूझीलंडने सातव्यांदा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली असून, २४ मार्च रोजी आॅकलंडच्या ईडन पार्कवर त्यांची द. आफ्रिकेसोबत पहिली उपांत्य लढत होईल.गुप्तिलच्या झंझावातामुळे न्यूझीलंडने ६ बाद ३९३ धावा उभारल्या. विश्वचषकातील ही त्यांची सर्वोच्च खेळी. याआधी २००७ च्या विश्वचषकात कॅनडाविरुद्ध न्यूझीलंडने ५ बाद ३६३ धावा उभारल्या होत्या. गुप्तिलने १६३ चेंडूंत २४ चौकार आणि ११ षटकारांसह २३७ धावा ठोकल्या. वन डेत द्विशतक ठोकणारा न्यूझीलंडचा तो पहिला व जगातील पाचवा फलंदाज बनला. भारताचा रोहित शर्मा (२६४ धावा) याच्यानंतर गुप्तिलची दुसरी सर्वोच्च खेळी; तसेच विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट खेळी ठरली. प्रत्युत्तरात बोल्टच्या ४ बळींमुळे विंडीजचा डाव ३०.३ षटकांत २५० धावांत संपुष्टात आला. आक्रमक गेलने ३३ चेंडू टोलवीत ६१ आणि कर्णधार जेसन होल्डरने २६ चेंडूंत ४२ धावा केल्या. पण अन्य फलंदाज अपयशी ठरल्याने विंडीजला मोठ्या पराभवाचे तोंड पाहावे लागले. टीम साऊदी आणि डॅनियल व्हेट्टोरी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. बोल्टने प्रारंभीच विंडीजचे कंबरडे मोडले. आपल्या दुसऱ्याच चेंडूवर त्याने जॉन्सन चार्ल्स ३ व त्यानंतर लेंडल सिमन्स १२ यांना तंबूची वाट दाखवली.गेलने मात्र एक टोक सांभाळून षटकार-चौकारांची आतषबाजी सुरूच ठेवली होती. त्याने ३३ चेंडूंत दोन चौकार व आठ षटकारांसह अर्धशतक गाठले. मर्लोन सॅम्युअल्स (२७) चा झेल व्हेट्टोरीने एका हाताने पकडला. त्याआधी गेल-सॅम्युअल्स यांनी तिसऱ्या गड्यासाठी ३.४ षटकांत ५३ धावांची सर्वात मोठी भागीदारी केली. बोल्टने रामदीनला भोपळा न फोडताच बाद केल्याने विंडीजची स्थिती ४ बाद ८० झाली होती. डॅरेन सॅमी (२७) अ‍ॅण्डरसनच्या व कार्टर (३२ धावा) व्हेट्टोरीच्या चेंडूवर बाद झाला. विंडीजच्या २०० धावा अवघ्या २५ षटकांत झाल्या. पण पुढच्या षटकात आंद्रे रसेल (२०) बाद झाला. साऊदीने जेरोम टेलर (११) याला आणि व्हेट्टोरीने होल्डरला झेलबाद करीत विंडीजला गाशा गुंडाळण्यास भाग पाडले. त्याआधी गुप्तिलने १५२ चेंडूंत दुहेरी शतक पूर्ण केले. त्याने पहिले शतक १११ चेंडूत आणि नंतरच्या १३७ धावा ५२ चेंडूंत पूर्ण केल्या. डावाच्या तिसऱ्याच चेंडूवर सॅम्युअल्सने त्याचा शॉर्ट लेगवर झेल सोडून जीवदान दिले होते. गुप्तिल त्या वेळी चार धावांवर होता. कर्णधार ब्रँडन मॅक्युलम मात्र १२ धावा काढून बाद झाला. केन विलियम्सनने ३३ धावा केल्या. गुप्तिल आणि रॉस टेलर (४२) यांनी २२.३ षटकांत १४३ धावांची भागीदारी करीत धावसंख्येला आकार दिला. (वृत्तसंस्था) ६०.५% संघाच्या एकूण धावांपैकी इतक्या धावा एकट्या गुप्तिलने कुटल्या. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये संघाच्या एकूण धावसंख्येपैकी ६०% हून अधिक धावा एखाद्या फलंदाजाने फटकावण्याची ही दहावी वेळ आहे. अँड्रयु जॉन्स आणि स्कॉट स्टायरीश यांच्यानंतर अशी कामगिरी करणार गुपटील तिसरा फलंदाज.३१या सामन्यात ठोकण्यात आलेले षटकार वर्ल्डकप सामन्यात सर्वाधिक ठरले आणि एकदिवसीय क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचे ठरले.२३७ मार्टिन गुप्तिलने चोपलेल्या धावा वर्ल्डकपमधील सर्वोच्च वैयक्तिक धावा ठरल्या. याच वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने झिम्बाब्वेविरुध्द कुटलेल्या २१५ धावांचा विक्रम मार्टिनने मोडला. १५३ न्यूझीलंडने शेवटच्या दहा षटकात फटकावलेल्या धावा यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वोच्च ठरल्या. तर २००१ पासून खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात या धावा दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च ठरल्या. शेवटच्या १० षटकांत १६३ धावांचा चोप देण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे.३९३ न्यूझीलंडने उभारलेल्या धावा या वर्ल्डकप बाद फेरीतील सर्वाधिक धावा ठरल्या. शिवाय न्यूझीलंडच्याही वर्ल्डकपमधील सर्वोच्च धावा ठरल्या.गुप्तिलने पहिल्या ११७ धावांसाठी १२० चेंडू घेतले. यानंतर त्याने तुफान आक्रमण करताना अवघ्या ४३ चेंडूमध्ये २७९ च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने १२० धावांचा तडाखा दिला.मार्टिनने एकदिवसीय क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च वैयक्तिक धावा फटकावल्या. तर न्यूझीलंडकडून सर्वोच्च धावांचा विक्रम केला.३४ वेळा गुप्तिलने चेंडू सीमापार धाडला, ज्यात २४ चौकार व ११ षटकारांचा समावेश आहे. न्यूझीलंडकडून सर्वाधिक वेळा चेंडू सीमापार करण्याचा विक्रम नोंदवणारा गुप्तिल क्रिकेटविश्वात अशी कामगिरी करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला. सर्वाधिक वेळा चेंडू सीमापार करण्याचा विक्रम भारताच्या रोहित शर्माने नोंदवला आहे.त्याने श्रीलंकेविरुध्द २६४ धावा फटकावताना ४२ वेळा (३३ चौकार, ९ षटकार) चेंडू सीमापार फटकावला.