नवी दिल्ली : युरोपियन लीग खेळणारा पहिला भारतीय गुरप्रीत सिंग संधूने पुढील वर्षी युरोपियन क्लब फुटबॉलमध्ये अव्वल पातळीवर खेळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. एआयएफएफच्या विकास समितीसोबत सुरुवात केल्यानंतर २४ वर्षीय गुरप्रीत युरोपच्या अव्वल दर्जाच्या संघांसोबत स्पर्धात्मक लढत खेळणारा पहिला भारतीय ठरला. त्याने ही लढत नॉर्वेचा संघ स्टाबीक एफसीतर्फे खेळली होती. संधू म्हणाला, ‘माझे नॉर्वेमध्ये अद्याप एक सत्र शिल्लक आहे, पण वैयक्तिक विचार करता मी युरोपातील मोठ्या क्लबमध्ये संधी मिळण्याच्या शोधात आहे.’गेल्या मोसमाबत चमकदार कामगिरी केल्यानंतर पंजाबच्या या फुटबॉलपटूला दुखापतीमुळे संघाबाहेर बसावे लागले. करारानुसार त्याला स्टाबीकसोबत आणखी एक सत्र खेळायचे आहे. गुरप्रीत म्हणाला, ‘चुकीच्या वेळी दुखापत झाली. एकूण विचार करता हे वर्ष महत्त्वाचे ठरले, पण दुखापतीमुळे धक्का बसला.’गुरप्रीतच्या मते देशातील आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी उदयोन्मुख खेळाडूंना युरोपियन देशांमध्ये खेळायला संधी द्यायला हवी. (वृत्तसंस्था)आपल्या येथील सर्वोत्तम युवा खेळाडू युरोप किंवा भारताबाहेर सरावासाठी पाठवायला हवे. तेथे चांगल्या सुविधा व चांगले प्रशिक्षण मिळू शकते. युवा खेळाडूंना बाहेर संधी मिळाली तर त्याचा राष्ट्रीय संघाला लाभ होईल. राष्ट्रीय संघाची कामगिरी सुधारली तर त्याचा भारतीय फुटबॉलला फायदा मिळेल. भारतात खेळाडूंना तयार करणे सोपे नाही. त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. - गुरप्रीत सिंग
गुरप्रीतचे लक्ष्य युरोपचे मोठे क्लब
By admin | Published: December 28, 2016 3:03 AM