नवी दिल्ली- कॉमनवेल्थ गेममध्ये भारताचं खातं उघडलं आहे. वेटलिफ्टिंग प्रकारात भारताच्या गुरू राजा यांनी 56 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली आहे. 28 वर्षीय गुरू राजा यांनी 249 किलोचं वजन उचलत भारताला रौप्य पदक मिळवून दिलं आहे. सुरूवातीला गुरूराजा यांनी 111 किलो वजन उचललं नंतर तिसऱ्या फेरीत 138 किलो वजन उचलण्याची कामगिरी गुरू राजा यांनी केली. शेवटच्या फेरीत 249 किलो वजन उचलत गुरू राजा यांना रौप्य पदक मिळालं.
मलेशियाच्या मुहम्मद अझहर अहमद यांनी 261 किलो वजन उचलत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. कास्य पदक श्रीलंकेकडे गेलं अशून चतुरंगा लकमल यांनी 248 किलो वजन उचलत कास्य पदक कमावलं आहे.
गुरू राजा यांनी 2010मध्ये वेटलिफ्टिंगला सुरूवात केली. वॉमनवेल्थ सिनिअर वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदकाची कमाई करणाऱ्या गुरूराज यांनी 2016मध्ये पेनंग स्पर्धेत 249 किलो वजन उचललं होतं. 2016च्या शेवटी झालेल्या साऊन एशियन गेम्समध्ये गुरू राजा यांनी सुवर्ण पदक मिळवलं होतं.
दरम्यान, ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे २१ व्या कॉमनवेल्थ गेम्सला सुरुवात झालेली आहे. कालच्या दिवशी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.