चॅम्पियन्स चषक : भारतीय हॉकी संघ जाहीर, सरदार पुन्हा कर्णधार, गुरजिंदर, हरजोतला संधी
नवी दिल्ली : हॉकी इंडियाने भुवनेश्वर येथे 14 डिसेंबरपासून होणा:या चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेसाठी 18 सदस्यीय भारतीय हॉकी संघ जाहीर केला आह़े या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा एकदा सरदार सिंगकडे सोपविली आह़े या संघात स्ट्रायकर गुरविंदर सिंग चांडी याला स्थान मिळाले नाही़ गुरजिंदर सिंग, हरजोत सिंग या दोन नव्या चेह:यांना मात्र संधी देण्यात आली आह़े
मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर 18 नोव्हेंबर रोजी झालेल्या निवड चाचणीनंतर हॉकी इंडियाच्या निवडकत्र्यानी चांडीच्या जागी संघात ललित उपाध्याय याला संधी दिली आह़े ललितने यापूर्वी भारतीय संघाचे 9 सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे, तर उपकर्णधारपदाची जबाबदारी गोलकिपर पी़आऱ श्रीजेश याच्यावर सोपविण्यात आली आह़े
या संघात मिडफिल्डर चिंगलेनसाना सिंह यालाही जागा मिळाली नाही़ त्याच्याऐवजी एस़ के ़ उथप्पा याची निवड करण्यात आली आह़े हॉकी इंडियाचे निवडकर्ते हरबिंदर सिंग, आर. पी.़ सिंग, अजरुन हलप्पा, हाय परफॉरमन्स निदेशक रोलेंट ओल्टमस, प्रशिक्षक ज़े फेलिक्स आणि मॅथ्यूज आइल्स यांनी हा संघ निवडला आह़े
चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आपला पहिला सामना 6 डिसेंबर रोजी जर्मनीशी खेळणार आह़े त्यानंतर 7 डिसेंबर रोजी भारताचा सामना अर्जेटिना आणि 9 डिसेंबरला नेदरलँडशी झुंजावे लागणार आह़े
चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेसाठी जाहीर संघ
गोलकिपर : पीआर श्रीजेश आणि हरजोत सिंग, डिफेंडर : रूपिंदरपाल सिंग, व्ही़ आर. रघुनाथ, बीरेंद्र लाकडा, कोथाजित सिंग, गुरबाज सिंग आणि गुरजिंदर सिंग, मिडफिल्डर : मनप्रीत सिंग, सरदार सिंग, धर्मवीर सिंग, दानिश मुज्तबा आणि एस़ के. उथप्पा़ फॉरवर्ड : रमनदीप सिंग, एस़ व्ही़ सुनील, आकाशदीप सिंह, निकिन थिमैया आणि ललित उपाध्याय़