पर्थ : आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर वेस्टर्न आॅस्ट्रेलिया इलेव्हनविरुद्ध शुक्रवारी ट्वेंटी-२0 सराव सामन्यात ७४ धावा फटकावून सूर गवसल्याचे संकेत देणारा सलामीवीर शिखर धवनने या अर्धशतकामुळे आत्मविश्वास दुणावला असल्याचे म्हटले आहे.धवन म्हणाला, ‘‘कोहलीच्या साथीने १०० धावांची भागीदारी करणे मुख्य लढत सुरू होण्याआधी गमावलेली लय पुन्हा मिळवण्यासाठी ही योग्य वेळ होती. या सराव सामन्यात आम्हाला आत्मविश्वास मिळवण्यास मदत मिळेल आणि भारतीय संघ आॅस्ट्रेलियन संघाचा आव्हानाचा सामना करण्यास सज्ज आहे.’’धवनने युवा वेगवान गोलंदाज बरिंदर शरनची स्तुती केली असून, या डावखुरा गोलंदाजाने संघाच्या आशा उंचावल्या असल्याचे सांगितले. भारतीय संघ या दौऱ्यात पाच वनडे आणि तीन ट्वेंटी-२0 सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला वनडे सामना १२ जानेवारी रोजी होणार आहे.(वृत्तसंस्था)आमचे सर्व लक्ष आगामी सामन्यावर केंद्रित झाले आहे. आॅस्ट्रेलियन संघ आमच्याविरुद्ध आक्रमक खेळल्यास आम्हालादेखील त्यांच्याविरुद्ध आक्रमक पावित्रा अवलंबावा लागेल. सराव सामन्यात मी धावा केल्यामुळे मला आनंद वाटतोय. त्यामुळे मला खूप आत्मविश्वास मिळाला. मी खेळपट्टीशी जुळवून घेतले आणि आगामी सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.- शिखर धवन
अर्धशतकाने आत्मविश्वास दुणावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2016 4:36 AM