शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

Happy Birthday Little Master, तर सुनील गावसकरांना करावी लागली असती मासेमारी

By admin | Published: July 10, 2017 12:17 PM

जागतिक पातळीवर भारतीय क्रिकेटला मान्यता आणि भारतीय खेळाडूंना आत्मविश्वास मिळवून देण्याचे श्रेय सुनील गावसकर यांच्याकडे जाते.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 10 - सुनील गावसकर यांचा जन्म 10 जुलै 1949 रोजी मुंबईत झाला. आज त्यांचा 68 वा वाढदिवस आहे. क्रीडाविश्वातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सर्व आजी-माजी खेळाडूंनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. जागतिक पातळीवर भारतीय क्रिकेटला मान्यता आणि भारतीय खेळाडूंना आत्मविश्वास मिळवून देण्याचे श्रेय सुनील गावसकर यांच्याकडे जाते. कर्णधारपदी असताना हूक, पुल यासारख्या आवडत्या फटक्यांना नियंत्रित ठेऊन, योजनाबद्ध रीतीने भारतीय संघाला संकटातून बाहेर काढण्याची कामगिरी त्यांनी अनेक वेळा पार पाडली. त्याचबरोबर विजय हजारे, मांजरेकर यांच्या परंपरेतील तंत्रशुद्ध खेळ विकसित करून त्यास सातत्याची जोड दिली. सरळ बॅटने खेळणारे सुनील जगातील सर्वात महान आघाडीच्या फलंदाजापैकी एक आहेत. कसोटी सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातील सर्वोत्तम आघाडीचे फलंदाज म्हणून त्यांना गणले जाते. भारतीय संघातर्फे त्यांनी 125 कसोटी सामने खेळून 51.12 सरासरीने एकूण 10,122 धावा काढल्या आहेत. गावसकर यांच्या विषयीच्या काही अशा गोष्टी आहेत ज्या कदाचीत तुम्हाला माहित नसतील. - गावसकरांच्या जन्माची कथाही गमतीदार आहे. त्यांच्या जन्माच्या वेळी परिचारिकेने त्याला दुपट्यात गुंडाळून त्याच्या आईजवळ ठेवण्याऐवजी चुकून एका कोळणीजवळ ठेवले होते आणि त्या कोळणीचे मुल गावसकरच्या आईजवळ. पण गावसकरचे मामा आणि भारताचे माजी यष्टीरक्षक माधव मंत्री ह्यांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही आणि त्यांनी वेळीच चूक सुधारली. नाहीतर सुनील गावसकर नावाचा महान खेळाडू भारताला मिळाला नसता, तो कुठेतरी समुद्रावर मासेमारी करत बसला असता.- गावसकर यांचे शिक्षण मुंबईतील सेंट झेवियर्समध्ये झाले. 1970 मध्ये त्यांनी बी.ए. ची पदवी संपादन केली. तर 1974 त्यांचा विवाह मार्शनील मेहरोत्रा या युवतीशी झाला. त्यांना रोहन हा एक मुलगा आहे.

- गावसकर यांनी क्रिकेटचे धडे प्रसिद्ध प्रशिक्षक कमल भांडारकर यांच्याकडून गिरवले.

- 1971 मध्ये त्यांनी वेस्ट इंडिज विरोधात भारतीय संघात पदार्पण केलं. विंडिजच्या तोफखान्यासारख्या भासणार्‍या, आग ओकणार्‍या गोलंदाजांसमोर खेळपट्टीवर पाय रोवून त्यांनी फलंदाजी केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करत असताना या मालिकेतील त्या खेळाडूचा खेळ क्रिकेट रसिकांना थक्क करून सोडणारा होता. संपूर्ण मालिकेत 1 द्विशतक आणि 3 शतके यांच्या साहाय्याने154.80 च्या सरासरीने एकूण 774 धावांचा डोंगर उभा केला. गावसकरच्या या खेळीमुळे भारताने ही मालिका 1-0 अशी जिंकली.

- महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना गावसकर यांना प्रत्येक शतकामागे वडिलांकडून दहा रुपये प्रोत्साहन म्हणून मिळत. महाविद्यालयीन क्रिकेटमध्ये पदार्पण करताच त्याने गुजरात विद्यापीठाविरुद्ध शतक ठोकले होते.

आणखी वाचा - 

सुनील गावसकर अपघातातून बचावले 

सुनील गावसकर यांच्यासोेबत मृणालने घेतले डिनर 

Happy Birthday एम.एस.धोनी ! जाणून घ्या माहीच्या या खास गोष्टी

- मुंबई विद्यापीठाकडून खेळताना त्याचा वेस्ट इंडीजच्या हंट याच्याशी परिचय झाला. फटका मारण्याआधी बॅट उचलून मागे सरण्याचा (बॅक लिफ्ट) पवित्रा, बॅट खूपच सरळ आणि उंच उचलणे व डावा पाय चेंडूच्या टप्प्यापर्यंत पुढे ताणणे, या हंटच्या तंत्रावर त्याने स्वत:चे फलंदाजीचे तंत्र बेतले.

- 1970 साली सुनील यांची निवड रणजीसाठी झाली. त्यांच्या पूर्ण प्रदीर्घ क्रिकेट कारकीर्दीत त्यांच्या कामगिरीचा आलेख नेहमी चढता राहिला. या कालावधीत सातत्याने आत्मपरीक्षण करत त्यांनी क्रिकेटबाबत स्वत:चे असे शास्त्रशुद्ध तंत्र विकसित केले. वेगवेगळ्या देशातील हवामान आणि खेळपट्टी यांचा अभ्यास करून, त्याप्रमाणे खेळाचे नियोजन केल्यामुळे परदेशातील खेळपट्‌ट्यांवरदेखील त्यांनी उच्च दर्जाचा खेळ केला. हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

- प्रथम श्रेणी सामन्यांतील त्यांच्या 25834 धावा धावांची भूक व त्यानुसार कामगिरी दर्शवतात. एक आदर्श ह्यस्लीपमधील क्षेत्ररक्षकह्ण असाही त्यांचा आदराने उल्लेख केला जातो. - सुनील गावस्कर निवृत्त होत असताना एकदिवसीय सामन्यांचे स्वरूप पालटत होते. 1987 मध्ये त्यांनी नागपूरच्या मैदानावर न्युझीलंडविरुद्ध 88 चेंडूत 103 धावा ठोकल्या होत्या. या खेळीतून त्यांनी आपले एकमेव एकदिवसीय शतक साकारले आणि आपण क्रिकेटच्या ह्ययाह्ण प्रकारातही किती उच्च दर्जा गाठू शकतो, याची झलक त्यांनी दाखवली. १९८३ च्या विश्र्वचषक विजेता भारतीय संघाचे ते महत्त्वाचे सदस्य होते.

- गावसकरने आपल्या पहिल्या हजार धावा ११ कसोटीतील २१ डावांत काढल्या होत्या.

- सर डॉन ब्रॅडमन यांचा कसोटी क्रिकेटमधील 29 शतकांचा विक्रम मोडला. हा विक्रम करण्यास ब्रॅडमन यांना 52 सामने खेळावे लागले तर आपल्याला 95 सामने खेळावे लागले याची गावस्कर प्रांजळपणे कबुली देतात. या 29 शतकांमध्ये 3 द्विशतकांचा समावेश असून नाबाद 236 हा वैयक्तिक उच्चांक आहे.- सुनील गावसकर यांनी सनी डेज (१९७६), आयडॉल्स (१९८३), रन्स इन रुइन्स (१९८४) आणि वन डे वंडर्स (१९८५) ही पुस्तके लिहिली आहेत. क्रिकेट समालोचक, समीक्षक आणि अनुभवी खेळाडू या नात्याने आजही ते नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करत असतात. अशा या हरहुन्नरी विक्रमवीराचे नाव भारतीय क्रिकेट जगतात नेहमीच अभिमानाने घेतले जाईल. क्रिकेट जगतात सनी ह्या टोपण नावाने प्रसिद्ध असलेल्या ह्या लिटिल मास्टरचा आज 68 वा वाढदिवस आहे.