शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

Happy Birthday एम.एस.धोनी ! जाणून घ्या माहीच्या या खास गोष्टी

By admin | Published: July 07, 2017 11:40 AM

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा 36वा वाढदिवस आहे. दोन दिवसांपूर्वीच धोनी आणि त्याची पत्नी साक्षीनं 4 जुलैला लग्नाचा सातवा वाढदिवस साजरा केला

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा 36वा वाढदिवस आहे. दोन दिवसांपूर्वीच धोनी आणि त्याची पत्नी साक्षीनं 4 जुलैला लग्नाचा सातवा वाढदिवस साजरा केला. धोनी सध्या भारतीय टीमसोबत वेस्ट इंडिजच्या दौ-यावर असून त्याची पत्नी साक्षी आणि मुलगी जीवादेखील त्याच्यासोबत आहेत. धोनीनं 2017च्या सुरुवातीलाच वन-डे आणि टी-20 च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. 
 
एम.एस.धोनी हा टीम इंडियाचा असा खेळाडू आहे ज्यानं भारतीय क्रिकेट टीमला सर्व काही दिले. धोनी जेवढा उत्तम खेळाडू आहे तेवढाच तो शांत स्वभावाचा माणूस म्हणून ओळखला जातो. भारतीय क्रिकेटमधील 13 वर्षांचा त्याचा आतापर्यंतचा प्रवास वाखाणण्याजोगा आहे. 
आणखी बातम्या वाचा
(रहाणे-धोनीचा खेळ संघासाठी की जागा टिकवण्यासाठी)
(धोनी म्हणतो, मी आहे जुन्या मद्याप्रमाणे !) 
(विंडीजविरुद्ध कर्णधार नसतानाही धोनीने मोडला अझरुद्दीनचा रेकॉर्ड)
 
जाणून घेऊया एम.एस. धोनीबाबतच्या काही गोष्टी
बालपण
7 जुलै 1981 साली रांचीतील पान सिंह यांच्या घरात जन्मलेल्या महेंद्र सिंह धोनीला लहानपणापासूनच खेळाच्या मैदानाचं आकर्षण होते. आईवडील, बहिण जयंती आणि भाऊ नरेंद्र असा त्याचा परिवार आहे.  
 
फुटबॉल होतं पहिलं प्रेम
फुटबॉल हे धोनीचं पहिलं प्रेम. शाळेच्या टीममध्ये तो गोलकीपर होता. सहभागीदारीतून  इंडियन सुपर लीगमधील चेन्नईयन एफसी संघ त्यानं खरेदीही केला आहे.  फुटबॉलनंतर त्याला बॅडमिंटनही खेळायला खूप आवडते
धोनीनं केली टीटीईची नोकरी 
धोनीच्या आयुष्यात बरीच वळणं आली. घरातून क्रिकेटमधील कारर्कीदीला विरोध असल्याने यावेळी त्यानं अनेक परीक्षाही दिल्या. यादरम्यान 2001-2003 काळात तो भारतीय रेल्वेमध्ये टीटीईची  (Travelling Ticket Examiner) नोकरी करत होता. त्याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार तो प्रामाणिकपणानं आपली नोकरी करत होता आणि रिकाम्या वेळात अनेकदा खडगपूर रेल्वे स्टेशनवर मज्जामस्ती करण्यातही तो पुढे असायचा.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एन्ट्री
ज्युनिअर क्रिकेटपासून ते बिहार क्रिकेट टीम, झारखंड क्रिकेट टीपासून ते इंडिया ए टीमपर्यंत आणि भारतीय टीमपर्यंतचा त्याचा प्रवास जवळपास 5-6 वर्षांत पूर्ण झाला. त्यानं 1998 मध्ये ज्युनिअर क्रिकेटपासून सुरुवात केली आणि डिसेंबर 2004 मध्ये तो बांगलादेशविरोधात वन-डे सामना खेळला, याद्वारे त्यानं आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 
 
पाकिस्तानचा उडवला होता धुव्वा 
धोनी बांगलादेशविरोधातील सामन्यात काही खास खेळी खेळू शकला नाही. मात्र पाकिस्तानविरोधातील पाचव्या वन-डे सामन्यात त्यानं 123 चेंडूत 148 धावा केल्या होता. यानंतर " तो मोठ्या केसांचा क्रिकेटर, धोनी कोण आहे?", असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. 
 
कार-बाईक्सचं वेड 
महेंद्र सिंह धोनीला बाईक्सचं प्रचंड वेड आहे. त्याच्याकडे जवळपास 2 डझन बाईक्स आहेत. शिवाय, त्याच्याकडे हमर सारख्या अनेक महागाड्या गाड्याही आहेत. 
 
साक्षी आणि जीवाची मिळाली सोबत 
करिअरच्या सुरुवातीला महेंद्र सिंह धोनीचं अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडण्यात आले. मात्र 4 जुलै 2010 रोजी देहरादूनच्या साक्षी रावतसोबत त्यानं विवाह करुन त्यानं सर्व चर्चांना पूर्णविराम लावला. धोनी आणि साक्षीला एका जीवा नावाची मुलगीदेखील आहे. 
 
आयसीसीच्या तीन ट्रॉफीचा बॉस 
महेंद्र सिंह धोनी एकमेव असा कर्णधार आहे, ज्याने आयसीसीच्या तिन्ही मोठ्या ट्रॉफी जिंकल्या आहेत. वर्ल्ड  टी 20 (2007), क्रिकेट वर्ल्ड कप (2011) आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (2013)चा किताब धोनीनं जिंकला आहे. 
 
सर्वाधिक कमाई असलेला क्रिकेटर
एम.एस. धोनी जगभरातील सर्वाधिक कमाई घेणार क्रिकेटरही ठरला आहे. टेस्ट मॅचमधून निवृत्ती घेण्यापूर्वी त्याचे वार्षिक उत्पन्न 150 ते 190 कोटी रुपये एवढे होते. 
 
वनडे-टी20 च्या कर्णधारपदाचा राजीनामा 
2014मध्ये ऑस्ट्रेलिया दौ-यावर असताना कसोटी सामन्याचे कर्णधार पद सोडण्या-या  धोनीनं 2017च्या सुरुवातील वनडे व टी 20च्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला