नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्यानंतर शुक्रवारी पाकिस्तानसह विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणा-या सार्क राष्ट्रांच्या संघांनाही विश्वचषकासाठी टिष्ट्वटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ, अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी, बांगलादेशचे पंतप्रधान शेख हसीना आणि श्रीलंकेच्या राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांना विश्वचषकासाठी शुभेच्छा दिल्या. यंदा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतासह सार्क राष्ट्रातील पाच देश खेळत आहेत.मोदी यांनी टिष्ट्वटरवर लिहिले, राष्ट्रपती अशरफ गनी, पंतप्रधान शेख हसीना, पंतप्रधान नवाज शरीफ आणि राष्ट्रपती सिरिसेना यांच्याशी चर्चा केली. क्रिकेट विश्वचषकासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान म्हणाले की, सार्क राष्ट्रातील पाच देश विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळत आहेत आणि याविषयी आपण खूप उत्साहित आहोत. ही स्पर्धा खिलाडूवृत्तीने आणि खेळ रसिकांसाठी आनंददायक ठरेल, अशी आपल्याला खात्री वाटते. क्रिकेट हा खेळ आमच्या येथे एकमेकांना जोडतो आणि सद्भावनेला वाढवतो. सार्क राष्ट्रातील खेळाडू मेहनतीने खेळतील आणि आमच्या भागाचा सन्मान वाढवतील, अशी आपल्याला आशा आहे, असेही ते म्हणाले. सोनोवाल यांच्या टीम इंडियाला शुभेच्छाकेंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी क्रिकेटचे महाकुंभ ११ व्या विश्वचषकासाठी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. सोनोवाल शुभेच्छा संदेशात म्हणतात की, करोडो हिंदुस्थानींचा आशीर्वाद टीम इंडियाला आहे आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया निश्चितच ट्रॉफी जिंकेल आणि देशवासीयांच्या आशा पूर्ण करील, असा आपल्याला पूर्ण विश्वास आहे.
विश्वचषकासाठी मोदींच्या सार्क देशांना शुभेच्छा
By admin | Published: February 14, 2015 12:19 AM