केदार लेले - बिल, स्वित्ङरलड
47व्या बिल मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या फेरीत विश्वनाथन आनंदचा सहकारी ग्रँडमास्टर वॉएटशेक याने भारताच्या पेंटेला हरिकृष्णला बरोबरीत रोखले, तर सहाव्या फेरीत या स्पर्धेतील आघाडीवर असलेला मॅक्सिम व्ॉशे-लेग्राव याने त्याला बरोबरीत रोखले.
पाचव्या आणि सहाव्या फेरीत पेंटेला हरिकृष्ण पांढ:या मोह:यांनी खेळत असताना अनुक्रमे वॉएटशेक आणि मॅक्सिम व्ॉशे-लेग्राव यांनी त्यांच्याविरुद्ध सिसिलियन नॅजदॉर्फ पद्धत अवलंबली. दोन्ही डावांमध्ये सहाव्याच खेळीवर वजीराची वेगवेगळी अशी नावीन्यपूर्ण चाल रचत त्याने आपल्या प्रतिस्पध्र्याना आश्चर्यचकित करण्यात सफलता मिळवली. पण त्याचे रूपांतर विजयात मात्र होऊ शकले नाही आणि त्याला बरोबरीवरच समाधान मानावे लागले.
पाचव्या फेरीत मोटीलेवला यिफान होऊने बरोबरीत रोखले, तर सहाव्या फेरीत यिफान होऊने उत्कृष्ट बचावाचा नमुना पेश करीत अनीश गिरीविरुद्ध डाव बरोबरीत सोडवला.
सहाव्या फेरीत मोटीलेव याने वॉएटशेकविरुद्ध तीनदा त्याच-त्याच खेळींची रचना करीत डाव बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले.
पाचव्या फेरीत मॅक्सिम व्ॉशे-लेग्राव याने अनीश गिरीवर विजय मिळवला आणि आपल्या निकटच्या प्रतिद्वंदीच्या विरुद्ध एका गुणाची आघाडी मिळवली. सहाव्या फेरीत हरिकृष्णविरुद्धची लढत बरोबरीत सोडवून 4 गुणांसह त्याने एकटय़ाने आघाडी टिकवून धरली आहे.
3 गुणांसह हरिकृष्ण, वॉएटशेक आणि यिफान होऊ संयुक्त दुस:या स्थानी आहेत. मोटीलेव आणि अनीश गिरी 2.5 गुण मिळवून संयुक्त तिस:या स्थानावर आहेत.
सहा बुद्धिबळपटूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेच्या चार फे:या अद्याप बाकी आहेत. स्पर्धेत रविवार (2क् जुलै) हा विश्रंतीचा दिवस होता.