मुंबई : गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीनंतर हरप्रीतसिंहच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर मध्य विभागाने सय्यद मुश्ताक अली करंडक आंतरविभागीय टी-२0 क्रिकेट स्पर्धेत रविवारी पश्चिम विभागाचा ६ गडी राखून पराभव केला.पश्चिम विभागाने दिलेल्या १६१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हरप्रीत (६२) आणि महेश रावत (नाबाद ३0) यांनी चौथ्या गड्यासाठी केलेल्या ७९ धावांच्या बळावर मध्य विभागाने १0 चेंडू राखत आणि ४ बाद १६५ धावा करीत सहज विजय मिळवला. अंबाती रायुडूनेदेखील २४ धावांचे योगदान दिले.हरप्रीतने ४२ चेंडूंच्या खेळीत ४ षटकार आणि २ षटकार मारले, तर रावतने २२ चेंडूंना सामोरे जात ४ चौकार मारले. त्याआधी अनिकेत चौधरी (४७ धावांत ३ बळी), अमित मिश्रा (२८ धावांत २ बळी) यांच्या सुरेख गोलंदाजीसमोर पश्चिम विभागाने ६१ धावांत ५ फलंदाज गमावले होते; परंतु दीपक हुड्डा (२६ चेंडूंत नाबाद ४९) आणि आदित्य तारे (३३ चेंडूंत ४0 धावा) यांच्या खेळीच्या बळावर संघ ८ बाद १६0, अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारू शकला. हुड्डाने चार षटकार आणि २ चौकार मारले.संक्षिप्त धावफलक :पश्चिम विभाग : २0 षटकांत ८ बाद १६0. (दीपक हुड्डा नाबाद ४९, आदित्य तारे ४0. अनिकेत चौधरी ३/४७, अमित मिश्रा २/२८).मध्य विभाग : १८.२ षटकांत ४ बाद १६५. (हरप्रीतसिंह ६२, महेश रावत नाबाद ३0, अंबाती रायुडू २४, ईश्वर चौधरी २/२0, इरफान पठाण १/३९, प्रवीण तांबे १/२७).उत्तर विभागाच्या विजयात गंभीर, धवन चमकलेगौतम गंभीर व शिखर धवन यांचे अर्धशतक आणि रिषभ पंतच्या खेळीने उत्तर विभागाने सय्यद मुश्ताक अली करंडक आंतरविभागीय टी २0 क्रिकेट स्पर्धेत रविवारी दक्षिण विभागाचा आठ गडी राखून विजयी प्रारंभ केला. उत्तर विभागासमोर १७४ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य होते; परंतु गंभीर (५१ चेंडूंत ८१ धावा) आणि शिखर धवन (३८ चेंडूंत ५0 धावा) यांनी सलामीसाठी १0३ धावांची भागीदारी करताना जोरदार सुरुवात केली़संक्षिप्त धावफलकदक्षिण विभाग : २0 षटकांत ५ बाद १७३. (रिकी भुई ५0, विजय शंकर नाबाद ३४, मयंक अग्रवाल ३२. आशिष नेहरा २/३५, मयंक डागर २/३१, हरभजनसिंग १/१३).उत्तर विभाग : १८.४ षटकांत २ बाद १७६. (गौतम गंभीर ८१, शिखर धवन ५0, रिषभ पंत नाबाद ३३. मृगन आश्विन १/२३, श्रीनाथ अरविंद १/३२).
हरप्रीतचे अर्धशतक; मध्य विभाग विजयी
By admin | Published: February 13, 2017 12:03 AM