शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
2
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
3
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
4
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
5
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
6
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
7
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
8
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
9
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
10
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
11
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
12
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
13
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
14
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
15
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
16
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
17
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
18
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
19
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
20
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू

हर्षा जोड

By admin | Published: February 13, 2015 12:38 AM

टीम इंडियातर्फे आतापर्यंत चमकदार कामगिरी करणारा भुवनेश्वर कुमारही संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. स्पिन केवळ भारताची शक्ती नसून धोनीसाठी कम्फर्ट झोन ठरत आहे. ज्या वेळी चेंडू थांबून येतो आणि टर्न होतो, त्या वेळी धोनीचे नेतृत्व उल्लेखनीय ठरत असल्याचे दिसून येते. क्षेत्ररक्षणही दर्जेदार भासते आणि कामचलाऊ गोलंदाजही सेट फलंदाजांवर वर्चस्व गाजवितात; पण ऑस्ट्रेलियातील खेळप˜्या टणक आहेत. फिरकीपटूंना या खेळप˜ीकडून मदत मिळविण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात. येथे भारतीय संघ पिछाडीवर असल्याचे दिसून येते. खेळप˜ीकडून मदत मिळविण्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे. त्यामुळे फलंदाजांवर अधिक धावा फटकाविण्याचे दडपण राहणार आहे. जर चांगली सुरुवात मिळाली, तर भारतीय फलंदाजांमध्ये मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता आहे. असे जर घडले, तर भारतीय फल

टीम इंडियातर्फे आतापर्यंत चमकदार कामगिरी करणारा भुवनेश्वर कुमारही संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. स्पिन केवळ भारताची शक्ती नसून धोनीसाठी कम्फर्ट झोन ठरत आहे. ज्या वेळी चेंडू थांबून येतो आणि टर्न होतो, त्या वेळी धोनीचे नेतृत्व उल्लेखनीय ठरत असल्याचे दिसून येते. क्षेत्ररक्षणही दर्जेदार भासते आणि कामचलाऊ गोलंदाजही सेट फलंदाजांवर वर्चस्व गाजवितात; पण ऑस्ट्रेलियातील खेळप˜्या टणक आहेत. फिरकीपटूंना या खेळप˜ीकडून मदत मिळविण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात. येथे भारतीय संघ पिछाडीवर असल्याचे दिसून येते. खेळप˜ीकडून मदत मिळविण्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे. त्यामुळे फलंदाजांवर अधिक धावा फटकाविण्याचे दडपण राहणार आहे. जर चांगली सुरुवात मिळाली, तर भारतीय फलंदाजांमध्ये मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता आहे. असे जर घडले, तर भारतीय फलंदाज वर्चस्व गाजविण्यास सज्ज आहेत. रोहित शर्मा, शिखर धवन, सुरेश रैना हे भारतीय फलंदाज मॅच विनर ठरू शकतात; पण त्यात ते लवकर बाद होण्याचा धोकाही असतो. त्यामुळे भारतीय संघाची भिस्त विराट कोहलीवर अधिक अवलंबून आहे. कोहली फॉर्मात असला तर दडपण झुगारण्यास सक्षम असतो. जर एक इच्छा पूर्ण करण्याचा वर मिळाला, तर भारतीय संघ निश्चितच कोहलीला सूर गवसावा, हाच वर मागेल.
अजिंक्य रहाणेनेही छाप पाडली आहे. तो या स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूंमध्ये स्थान मिळवू शकतो. त्याचप्रमाणे कर्णधार धोनीलाही सूर गवसणे आवश्यक आहे. पण, २०११च्या विश्वकप स्पर्धेत युवराजच्या समावेशामुळे संघाचा समतोल साधला गेला होता, या वेळी मात्र त्याची उणीव भासत आहे. आता रवींद्र जडेजाला ही भूमिका बजवावी लागणार असून, स्टुअर्ट बिन्नीकडूनही चांगल्या कामगिरीची आशा आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठली, तर तो चांगला निकाल असेल आणि जेतेपद कायम राखले तर सोनेपे सुहागा. (टीसीएम)
०००