शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

हर्षदा निठवेला सांघिक गोल्ड

By admin | Published: September 20, 2016 5:29 AM

ज्युनिअर नेमबाजांनी अझरबैजान येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनिअर विश्वचषक नेमबाजीत पदकांची लूट सुरू ठेवली

नवी दिल्ली : ज्युनिअर नेमबाजांनी अझरबैजान येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनिअर विश्वचषक नेमबाजीत पदकांची लूट सुरू ठेवली आहे. भारताने दुसऱ्या दिवशी सोमवारी एका सुवर्णपदकासह सहा पदके जिंकली. यात महाराष्ट्राची हर्षदा निठवे हिने भारताला सांघिक सुवर्णपदक जिंकून देण्यात निर्णायक योगदान दिले. या स्पर्धेत आता भारताची एकूण पदकांची संख्या १३वर पोहोचली आहे. त्यात भारताने पहिल्याच दिवशी सात पदके जिंकली होती. त्यात तीन सुवर्णपदकांचा समावेश होता. त्यांपैकी दोन सुवर्णपदके जिंकून देण्यात महाराष्ट्राचा प्रतिभावान नेमबाज संभाजी पाटील याचा सिंहाचा वाटा होता.भारताला आज एकमेव सुवर्णपदक ज्युनिअर मुलींच्या १० मीटर एअर पिस्टल स्पर्धेत औरंगाबादच्या हर्षदा निठवे हिच्यासह यशस्विनी सिंह देशवाल, मलाइका गोयल यांच्या संघाने जिंकून दिले. भारतीय संघाने एकूण १,१२२ गुणांची नोंद केली. तुर्कीने रौप्य आणि उझबेकिस्तानने कांस्यपदक जिंकले. वैयक्तिक गटात हर्षदा निठवेचे कांस्यपदक थोडक्यात हुकले. तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. यात रशियाच्या लोमोव्हा मार्गारिटा हिने सुवर्णपदक जिंकले. झेक प्रजासत्ताकाच्या डेडोव्हा अ‍ॅनाने रौप्यपदक मिळविले. कस्यिंपदक इजिप्तच्या खेळाडूने जिंकले.गौरव राणा, हेमेंद्र कुशवाहा आणि सौरभ यांनी १० मीटर एअर पिस्टलमध्ये देशाला सांघिक रौप्यपदक जिंकून दिले. अनमोलने या स्पर्धेत वैयक्तिक गटात रौप्यपदक जिंकले. अनमोलने १९७.५ गुण नोंदवले. रशियन नेमबाजाने सुवर्ण जिंकले.गायत्री नित्यानंदमने सोनिका, अदितीसिंह यांच्या साथीने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकले. वैयक्तिक गटातही गायत्रीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताला दुसऱ्या दिवसातील अखेरचे पदक अनंतजितसिंह नरुका, सुखबीरसिंह आणि हम्हजा शेख या मुलांच्या स्कीट संघाने ३३७ गुणांसह कांस्यपदक जिंकले.>हर्षदाने खांद्याच्या दुखापतीनंतरही जिंकले सुवर्णस्पर्धेत उतरण्याआधी हर्षदा निठवे हिचा स्ट्रेचिंगदरम्यान खांदा दुखावला होता. त्यामुळे ती पदक जिंकू शकेल, अशी परिस्थितीच नव्हती; परंतु दुखापतीनंतरही हर्षदाने भारताला विश्वचषक ज्युनिअर नेमबाजीत सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकून दिले. त्याचप्रमाणे वैयक्तिक गटातही तिचे कांस्यपदक थोडक्यात हुकले. ती पूर्णपणे तंदुरुस्त असती, तर तिने वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले असते. कारण तिचा सरावातही स्कोअर चांगला होता, अशी प्रतिक्रिया हर्षदा निठवे हिचे प्रशिक्षक संग्राम देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.>हर्षदाची आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी२०१५ : नवी दिल्ली येथील आठवी एअर आशियाई स्पर्धेत वैयक्तिक कांस्य व सांघिक सुवर्ण२०१५ :कुवैत येथील १३व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत सांघिक सुवर्ण२०१६ :झेकोस्लाव्हिकिया येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग२०१६ :अझरबैजान येथील विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सांघिक सुवर्ण