शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

वडिलांनी 6 लाखांचं काढलं कर्ज अन् मुलीने मारला गोल्डन 'पंच', जाणून घ्या नीतूची 'यशस्वी कहाणी'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 7:48 PM

WBC 2023 : सध्या भारतात जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचा थरार रंगला आहे. 

nitu ghanghas father । नवी दिल्ली : सध्या भारतात जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचा (Women's World Boxing Championship) थरार रंगला आहे. या स्पर्धेत भारताच्या नीतू घनघासने कारकिर्दीतील पहिले सुवर्णपदक मिळवले. नीतूने 48 किलो वजनी गटात मंगोलियाच्या लुत्सायखान अल्तानसेतसेगचा 5-0 असा दारूण पराभव केला आणि जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी भारताची 6वी महिला बॉक्सर ठरली. खरं तर नीतूची आदर्श ही भारताची मेरी कोम आहे, जिने 6 वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदके जिंकली आहेत. विजयानंतर नीतूने आपले पदक देशाला समर्पित केले. त्याचबरोबर वडिलांनी केलेल्या संघर्षाच्या आठवणींना देखील उजाळा दिला.

वडिलांनी नोकरीवरून सुट्टी घेतलीनीतूचा बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. यासाठी हरयाणातील भिवानी जिल्ह्यातील धनना गावात 19 ऑक्टोबर 2000 रोजी जन्मलेल्या नीतूच्या कुटुंबीयांनी तिला खूप पाठिंबा दिला. ज्यामध्ये नीतूचे वडील जय भगवान यांनी आपल्या मुलीला बॉक्सर बनवण्यासाठी चंदीगडमध्ये हरयाणा राज्यसभेतून सुट्टी घेतली होती. यावेळी त्यांना सुट्ट्यांचे पैसे मिळणे बंद झाले होते.

बसचे भाडे भरायला पैसे नव्हतेनीतूला देखील आर्थिक संघर्षाला सामोरे जावे लागले. स्पोर्ट्स तकशी बोलताना नीतूने म्हटले, "माझ्या आयुष्यात खूप आर्थिक समस्या आल्या. कधी कधी असे व्हायचे की गावापासून भिवानीपर्यंत बसने प्रवास करायला पैसे नसायचे. तरीही या अडचणींनीच मला इतके मजबूत केले की मी हे स्थान प्राप्त करू शकले." 

वडिलांनी काढलं कर्जनीतूच्या प्रशिक्षणासाठी तिच्या वडिलांनी केवळ नोकरीतून सुट्टी घेतली नाही तर शेतीही सुरू केली आणि खर्च भागवण्यासाठी सुमारे सहा लाख रुपयांचे कर्जही घेतले. जेणेकरून ते नीतूच्या जेवणावर आणि तिच्या प्रशिक्षणावर पैसे खर्च करू शकतील. यामुळेच पदक जिंकल्यानंतर नीतू म्हणाली, "पदक जिंकेपर्यंत अनेक अडचणी आल्या. माझ्या वडिलांनी मला खूप साथ दिली आणि नोकरी सोडून मला या खेळात साथ दिली. सुवर्णपदक जिंकण्याच्या प्रवासापर्यंत मला साथ दिल्याबद्दल माझ्या वडिलांचे आणि संपूर्ण कुटुंबाचे आभार मानू इच्छिते."

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :boxingबॉक्सिंगInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीGold medalसुवर्ण पदकHaryanaहरयाणाIndiaभारत