ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - शुक्रवारी जेव्हा भारतीय कर्णधार विराट कोहलीने सलग चौथं कसोटी द्विशतक साजरं करत सर डॉन ब्रॅडमॅन आणि राहुल द्रविड यांचा रेकॉर्ड तोडला, तेव्हा जगाच्या दुस-या कोप-यात दक्षिण अफ्रिकेच्या हाशिम आमलाने विराट कोहलीचा एक वन-डे रेकॉर्ड तोडला.
रेकॉर्डबद्दल बोलायचं गेलं तर हाशिम आमला विराट कोहलीला नेहमी स्पर्धा देत असतो. आता हाशिम आमलाने सर्वात जलद गतीने 24 वन-डे शतक करण्याचा रेकॉर्ड तोडला आहे. हाशिम आमलाने 142 सामन्यांमध्ये हा रेकॉर्ड केला आहे. कोहलीला हा रेकॉर्ड करण्यासाठी 161 सामने खेळावे लागले होते.
आश्चर्य वाटेल मात्र हाशिम आमला आणि विराट कोहलीमध्ये सुरु असलेल्या या शतकांच्या स्पर्धेत अजून एक खेळाडू आहे. शुक्रवारी जेव्हा आमलाने विराटचा रेकॉर्ड तोडला, तेव्हा त्याच सामन्यात त्याचा साथीदार खेळाडू क्विंटन डी कॉकने हामलाचा रेकॉर्ड तोडला. कॉकने 74 सामन्यांमधलं आपलं 12वं शतक ठोकलं. कॉकने हामलाचा 81 सामन्यांचा रेकॉर्ड मोडीत काढला. आमलाने विराटच्या 83 सामन्यांचा रेकॉर्ड मोडत हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता.