शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
3
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
4
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
5
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
6
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
7
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
8
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
9
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
10
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
11
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
12
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
13
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
15
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा
16
अनिल अंबानींचे अच्छे दिन परतले, सलग चौथ्या दिवशी Reliance Power ला अपर सर्किट; Infra मध्येही तेजी
17
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
18
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
19
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
20
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा

गीताच्या गुगलीवर हरभजन बोल्ड

By admin | Published: October 29, 2015 10:30 PM

जगभरातील फलंदाजांना आपल्या फिरकीने नाचवणारा आॅफस्पिनर हरभजन सिंग गुरुवारी येथे अभिनेत्री गीता बसरा हिच्या ‘गुगली’वर बोल्ड झाला आहे.

जालंधर : जगभरातील फलंदाजांना आपल्या फिरकीने नाचवणारा आॅफस्पिनर हरभजन सिंग गुरुवारी येथे अभिनेत्री गीता बसरा हिच्या ‘गुगली’वर बोल्ड झाला आहे. अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत भारतीय क्रिकेट संघाचा ‘टर्बनेटर’ गीतासोबत आज विवाहबद्ध झाला.हरभजन आणि गीता बसरा यांनी आज जालंधर फगवाडा रोडस्थित गुरुनानक मिशन नेत्रहीन आणि वृद्धाश्रमाच्या गुरुद्वारा येथे फेरे घेतले. या वेळेस आयपीएल टीम मुंबई इंडियन्सच्या मालकीन नीता अंबानी यांच्यासह अन्य दिग्गज उपस्थित होते.क्रीम रंगाची शेरवानी आणि लाल रंगाची पगडी परिधान केलेल्या हरभजनने गीतासोबत गुरुग्रंथ साहिब येथे शीख रीतीरिवाजाप्रमाणे फेरे घेतले आणि विवाहाचे सोपस्कार पार पाडले. गीताने पारंपरिक लाल आणि सोनेरी लहंगा परिधान केला होता.विवाहाचे रीतीरिवाज पार पडल्यानंतर भज्जीने गीतासोबत त्याची आई अवतौर कौर आणि गीताच्या आईवडिलांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी अनेक दिग्गजांनी वधू-वरास शुभेच्छा दिल्या. विवाहानंतर हरभजन लगेच रणजी ट्रॉफी खेळण्यात व्यस्त होणार आहे. तो सध्या पंजाबच्या रणजी संघाचा कर्णधार आहे.रिसेप्शन १ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे होणार आहे. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी येण्याची शक्यता आहे. याशिवाय युवराजसिंग, विराट कोहली, बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि प्रियंका चोपडा यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. भारतीय संघातील अन्य सदस्यदेखील रिसेप्शनला येण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)