रिओ : अमेरिकेच्या नौकानयन खेळाडूने खिलाडू वृत्तीचे आदर्श उदाहरण सादर केले. तो रिओ आॅलिम्पिकमधील खेळाडू नाही; पण ज्या ठिकाणी ही स्पर्धा होणार त्या रिओच्या सागरी किनाऱ्यावरील घाण स्वच्छ करण्याचा त्याचा निर्धार मात्र कायम आहे. तो याच कामात व्यस्त आहे. ब्रॅड फ्रँक नावाचा हा नौकानयनपटू आपल्या नौकेच्या साहाय्याने दररोज सागरी किनारा स्वच्छ करीत आहे. शहरातून येणारे नाले सागराला जोडले गेल्याने सर्व प्रकारची घाण काठावर पसरली आहे. या घाणीचा खेळाडूंना सामना करावा लागू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून फ्रँकने किनाऱ्याची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला. या कामात तो यशस्वी देखील ठरला. येथील पाण्यात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण असल्याचा निष्कर्ष काढण्यात आल्यानंतर काही महिन्यांपासून खाडी सफाईची मोहीम राबविण्यात आली. त्यात फ्रँक योगदान देत आहे.
‘तो’सागरी स्वच्छता मोहिमेत व्यस्त
By admin | Published: July 31, 2016 5:46 AM