मिरपूर : पहिल्या चेंडूपासूनच मोठे फटके मारण्याची क्षमता असलेल्या हार्दिक पंड्या याने कर्णधार महेंद्रसिंह धोनीला प्रभावित केले आहे. या युवा खेळाडूची धोनीने स्तुती केली आहे. तो म्हणाला, की टी-२० मध्ये भारतासाठी हार्दिक गेम चेंजर ठरला आहे. पंड्याने १८ चेंडूंतच ३१ धावा केल्या होत्या. आणि २३ धावा देत १ बळीही मिळवला. भारताने आशिया कपमध्ये पहिल्या सामन्यात बांगलादेशला ४५ धावांनी मात दिली. धोनी म्हणाला की, त्याला चार षटके टाकताना पाहून आनंद वाटला. त्यामुळे संघाची ताकद वाढली आहे. संघात बदल करण्याची गरज पडणार नाही. या संघात सात फलंदाज ठेवण्याची गरज काय, असा प्रश्नही उपस्थित होत होता. मात्र, हार्दिकसारखे खेळाडू संघात असतील तर ७ फलंदाज ठेवले जाऊ शकतात.’’ (वृत्तसंस्था)नेहराची शिस्त, युवराजच्या दृष्टिकोनाचे कौतुक आम्हाला हार्दिकला फार काही सांगण्याची गरज पडत नाही. त्याला फक्त चेंडू सीमारेषेबाहेर फेकणे माहीत आहे आणि तो तेच करतो. तो चौकार आणि षटकार जास्त लावतो. तो जितके जास्त सामने खेळेल तितकी त्याची कारकीर्द बहरत जाईल. पंड्याच्या समावेशामुळे संघ संतुलित झाला आहे. या प्रकारात ते खेळाडू जास्त चांगले योगदान देऊ शकतात, जे फलंदाजी आणि गोलंदाजीतही उत्तम योगदान देतात. युवा खेळाडूंच्या संघात ३६ वर्षांचा आशिष नेहरा आणि ३४ वर्षांचा युवराज सिंग आहे. या दोघांचा संघात समावेश होईल, असे फारसे कुणालाही वाटले नसेल. मात्र, नेहराची शिस्तप्रियता आणि युवराजचा दृष्टिकोन यांचे धोनीने कौतुक केले आहे. हे दोन्ही खेळाडू धोनीच्या रणनीतीचा महत्त्वाचा भाग ठरले. युवराजने पहिल्या सामन्यात १५ धावा केल्या. त्याबाबत बोलताना धोनी म्हणाला की, त्याचा दृष्टिकोन योग्य होता. अचानक जाऊन तुम्ही ते सर्व करू शकत नाही, जे तुम्ही ठरवलेले आहे. मोर्तुजाने केला शाकिबचा बचावबांगलादेशचा कर्णधार मश्रफी मोर्तुजा याने शाकिब अल हसनचा बचाव केला आहे. पहिल्या सामन्यात शाकिबने रोहित शर्माचा सोपा झेल सोडला होता. त्या वेळी रोहित शर्मा २१ धावांवर खेळत होता. त्यानंतर रोहितने ८३ धावा केल्या आणि सामना भारताच्या बाजूने फिरवला. मोर्तुजा म्हणाला की, ‘‘रोहितचा झेल सामन्यातील टर्निंग पॉइंट होता. मात्र झेल हा सुटू शकतो. शाकिब बांगलादेशच्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे.’’डावाची सुरुवात करणे अतिरिक्त जबाबदारीसर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्मा याने म्हटले की, डावाची सुरुवात करणे ही अतिरिक्त जबाबदारी आहे. अग्रक्रमात फलंदाजी करताना माझ्यावर अतिरिक्त जबाबदारी येते. माझी ही जबाबदारी आहे की चांगला स्कोर बनवावा आणि सामना जिंकण्याची सवय लावावी. क्रिकेटमध्ये अनुभव महत्त्वाचा ठरतो. अनुभवामुळेच संघाचा डाव कसा सावरावा, दबावातही कसे खेळावे हे कळते.’’