शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
2
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
3
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
4
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
5
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
6
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
7
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
8
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
9
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
10
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
12
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
13
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
14
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
15
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
16
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
17
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
18
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
19
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

ओव्हलमध्येही डब्बा गुल!

By admin | Published: August 16, 2014 12:08 AM

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत तरी भारतीय संघ लढाऊ वृत्ती दाखवेल, असे वाटत होते. मात्र, महेंद्रसिंग धोनी वगळता कोणीही लढाऊ बाणा दाखवला नाही

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत तरी भारतीय संघ लढाऊ वृत्ती दाखवेल, असे वाटत होते. मात्र, महेंद्रसिंग धोनी वगळता कोणीही लढाऊ बाणा दाखवला नाही. ओल्ड ट्रॅफर्डप्रमाणे इंग्लंडच्या गोलंदाजांनी ओव्हलमध्येही भारताचा डब्बा गुल केला. इंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर भारताचा पहिला डाव १४८ धावांत गडगडला. या उत्तरात मैदानात आलेल्या अ‍ॅलेस्टर कुक आणि सॅम रॉबसन यांनी संयमी खेळ करून पहिल्या दिवसअखेर बिनबाद ६२ धावा केल्या. पुन्हा एकदा नाणेफेकीचा कौल अ‍ॅलेस्टर कुकच्या बाजूने लागला आणि खेळपट्टीचा अचूक अंदाज बांधत त्याने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्याच षटकात त्याचा हा निर्णय जेम्स अ‍ॅण्डरसन याने योग्य ठरवला. त्याच्या या धक्क्यानंतर क्रिस जॉर्डन आणि क्रिस वोक्स यांनी भारताचा कणा मोडून इंग्लंडला पहिल्याच दिवशी फ्रंटसिटवर बसवले. या दोघांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. पावसामुळे एक तास उशिराने सुरू झालेल्या या सामन्यात खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलत इंग्लंडच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. २० षटकांच्या आत भारताचा निम्मा संघ ३६ धावांवर माघारी धाडून इंग्लंडने त्यांना निर्धार पक्का केला होता. इंग्लंड गोलंदाजांची भारतावर इतकी दहशत पसरली होती की स्टुअर्ट बिनी आणि महेंद्रसिंग धोनी या जोडीने सहाव्या विकेटसाठी १२ षटके खेळून काढत अवघ्या ८ धावा केल्या. बिन्नीचा अडथळा अ‍ॅण्डरसनने दूर करताच आर अश्विनसह धोनीने २४ धावांची भागीदारी करून संघर्ष केला. मात्र, वोक्सने अश्विनला माघारी पाठवून तो थांबवला. त्यानंतर भुवनेश्वर कुमार आणि वरुन अ‍ॅरोन यांनी अनुक्रमे जॉर्डन व वोक्सने बाद करून भारताची अवस्था ९० धावांवर ९ बाद अशी दयनीय केली, परंतु एका बाजूला धोनी तळ ठोकून होता. त्याने इशांत शर्माला सोबत घेत चतुराईने आणि तितक्याच आक्रमकपणे खेळ केला. त्याला ब्रॉडने बाद केले.