Neeraj Chopra Manu Bhaker : नीरज चोप्रा आणि मनू भाकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावरून नेटकऱ्यांनी हे दोघे लग्न करणार असल्याचा तर्क लावला. (Manu Bhaker Marrying Neeraj Chopra) अशातच आता मनूच्या वडिलांनी याप्रकरणी प्रथमच भाष्य केले. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील पदकविजेता नीरज चोप्रा आणि मनू भाकर प्रसिद्धीच्या झोतात आहेत. अशातच मनू भाकरची आणि नीरज चोप्राचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मनूची आई नीरजचा हात डोक्यावर ठेवत असल्याचे दिसते. (Manu Bhaker's father shuts down marriage rumours) नेटकऱ्यांनी भलताच तर्क लावून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दुसरीकडे मनू आणि नीरज एकमेकांशी बोलत असल्याचाही एक व्हिडीओ समोर आला आहे. (Neeraj Chopra Manu Bhaker News)
मनू भाकर आणि नीरज चोप्रा यांच्या व्हिडीओबद्दल मनूच्या वडिलांनी मौन सोडले. मनूचे वडील राम किशन यांनी सांगितले की, मनू अजून खूप लहान आहे. तिचे अद्याप लग्नाचे वय झाले नाही. आताच्या घडीला आम्ही त्याबद्दल कोणताही विचार करत नाही. याशिवाय पत्नी आणि नीरज चोप्राच्या व्हायरल व्हिडीओवर बोलताना राम किशन म्हणाले की, मनूची आई नीरजकडे आपल्या मुलाप्रमाणे पाहते. ते दैनिक भास्करशी बोलत होते.
ऑलिम्पिक २०२४ मध्ये पदक जिंकणारे खेळाडू नीरज चोप्रा (भालाफेक) - रौप्य पदकमनू भाकर (नेमबाज) कांस्य पदकअमन सेहरावत (कुस्ती) कांस्य पदकभारतीय पुरूष हॉकी संघ - कांस्य पदकस्वप्नील कुसाळे (नेमबाज) - कांस्य पदकमनू भाकर-सरबजोत सिंग (नेमबाज) - कांस्य पदक दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने पाच कांस्य आणि एक रौप्य अशी एकूण सहा पदके जिंकली. मागील ऑलिम्पिकपेक्षा यंदा भारताला एक पदक कमी मिळाले. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. मग भारताच्या हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले, तर भालाफेकमध्ये मागील ऑलिम्पिकमधील चॅम्पियन नीरज चोप्राने रौप्य पदकाला गवसणी घातली. याशिवाय अमन सेहरावतने कुस्तीत कांस्य पदकाची कमाई केली.