नवी दिल्ली: हीना सिद्धूचे पती रौनक पंडित यांना क्रीडा मंत्रालयाने राष्टÑकुल स्पर्धेसाठी जाणाऱ्या यादीतून वगळताच राष्टÑीय रायफल संघाने (एनआरएआय) मंत्रालयाला चांगलेच धारेवर धरले आहे. एनआरएआयने रौनक यांची नेमबाजी संघाचे हायपरफॉर्मन्स संचालक म्हणून नियुक्ती केली होती.मंत्रालयाने ज्या २१ नावांना कात्री लावली त्यात पीव्ही सिंधूची आई विजया पुसराला, सायना नेहवालचे वडील हरवीर सिंग आणि हीनाचे पती रौनक यांचा समावेश आहे. एनआरएआय अध्यक्ष रनिंदरसिंग यांनी टष्ट्वीटरवर क्रीडा मंत्रालयावर टीका करीत, ‘आम्ही आपल्या पर्यवेक्षकांना स्वखर्चाने पाठवू असे म्हटले आहे. आम्हाला आपल्याच देशात संघर्ष करावा लागतो,’ असे सांगून सर्व भानगडींवर लक्ष न देता खेळावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन रानिंदर यांनी हीनाला केले.आयओए अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी काल राष्टÑकुलला जाणाºया खेळाडूंच्या कुटुंबीयांचा सोबत जाण्याचा मुद्दा उकरूनकाढल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती.दरम्यान आघाडीची नेमबाज असलेल्या हीनाने रौनक हे आपले तांत्रिक प्रशिक्षकदेखील आहेत, असे स्पष्ट केले. ती पुढे म्हणाली, ‘माझ्या ११ वर्षांच्या नेमबाजी कारकीर्दीमध्ये रौनक हे गेली सहा वर्षे मला मार्गदर्शन करीत आहेत. अनेक वर्षांपासून प्रशिक्षकाचा मुद्दा पुढे येताच मला संघर्ष करावा लागतो. यामुळे मी कंटाळले आहे.’ (वृत्तसंस्था)
हीनाच्या पतीला राष्ट्रकुलतून वगळले, राष्ट्रीय रायफल संघाची क्रीडा मंत्रालयावर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 2:07 AM