शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

हायव्होल्टेज लढत आज

By admin | Published: February 27, 2016 4:06 AM

भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान आशिया कप टी-२० स्पर्धेत शनिवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना पुन्हा एकदा रंगतदार खेळ बघण्याची संधी

मीरपूर : भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान आशिया कप टी-२० स्पर्धेत शनिवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना पुन्हा एकदा रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळणार आहे. ‘सख्खे शेजारी, पण पक्के...’ अशी ओळख असलेल्या या संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या लढतीत सर्वांची नजर वादग्रस्त वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरवर राहील. आयसीसी विश्व टी-२० चॅम्पियनशिपमध्ये पहिल्या फेरीत पुढील महिन्यात उभय संघांदरम्यान लढत होणार आहे. त्या लढतीची झलक शनिवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत अनुभवाला मिळणार आहे. भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट लढतींना मोठा इतिहास लाभला आहे. उभय संघांदरम्यानच्या लढतींचा शेजारी राष्ट्रांच्या राजकारणावरही प्रभाव जाणवतो. शनिवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत वादग्रस्त गोलंदाज आमिरला अंतिम संघात स्थान मिळते किंवा नाही, याबाबत उत्सुकता आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्यामुळे पाच वर्षांच्या बंदीला सामोरा गेल्यानंतर आमिरने न्यूझीलंड दौऱ्यात राष्ट्रीय संघात पुनरागमन केले. आमिर भारतीय फलंदाजांविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करण्यास उत्सुक आहे. विराट कोहलीने यापूर्वीच आमिरच्या पुनरागमनाचे स्वागत केले आहे, पण कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह अन्य भारतीय खेळाडू स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळलेल्या या खेळाडूबाबत काय विचार करतात, याची कल्पना नाही. भारतात बीसीसीआयने एस. श्रीसंत, अंकित चव्हाण यांच्यासारख्या खेळाडूंवर आजीवन बंदी घातली आहे. त्यामुळे स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये त्यांना पुनरागमनची संधी नाही. आमिरने भारताविरुद्ध चांगली कामगिरी केली तर पाक क्रिकेट चाहत्यांच्या हृदयातही त्याला स्थान मिळेल. तयारीचा विचार करता उभय संघ गेल्या महिनाभरापासून बरेच टी-२० क्रिकेट खेळले आहेत. त्यामुळे उभय संघांची तयारी चांगली झाली आहे. भारताने विश्व टी-२० स्पर्धेची चांगली तयारी करताना यंदा सातपैकी सहा सामने जिंकले आहेत. दुसऱ्या बाजूचा विचार करता पाकिस्तानचे खेळाडू पाकिस्तान सुपर लीग खेळून येथे दाखल झाले आहे. जागतिक पातळीवर भारताला पाकविरुद्ध पराभव स्वीकारावा लागलेला नाही. धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला योग्यवेळी सूर गवसलेला आहे. जर संघव्यवस्थापनाचा पाठिंबा आहे, याची कल्पना असेल तर त्या खेळाडूला नैसर्गिक खेळ करता येतो. आमचा संघ मजबूत असून कुठल्याही प्रतिस्पर्ध्याचे आव्हान पेलण्यास सक्षम आहे. पाकिस्तानची गोलंदाजीची बाजू मजबूत असली तर आमची फलंदाजीची बाजू मजबूत आहे. केवळ मोहम्मद आमिरच नाहीतर अन्य गोलंदाजांविरुद्धही चांगली कामगिरी करण्यास प्रयत्नशील राहील. -रोहित शर्मा, भारतीय सलामीवीर आमचे वेगवान गोलंदाज पहिल्या सहा षटकांमध्ये भारताच्या आघाडीच्या फळीविरुद्ध वर्चस्व गाजवण्यास सक्षम आहेत. भारताची आघाडीची फळी मजबूत आहे. फिरकीपटूंविरुद्ध भारतीय फलंदाज चांगले खेळतात, असा अनुभव आहे, पण माझ्यासह पीएसएलमध्ये चमकदार कामगिरी करणारा मोहम्मद नवाज भारतीय फलंदाजांचे आव्हान पेलण्यास सक्षम आहे.- शाहिद आफ्रिदी, पाकिस्तानचा कर्णधारप्रतिस्पर्धी संघ : भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आशिष नेहरा, जसप्रीत बुमराह, अजिंक्य रहाणे, पार्थिव पटेल, भुवनेश्वर कुमार आणि हरभजन सिंग. पाकिस्तान : शाहिद आफ्रिदी (कर्णधार), मोहम्मद हफीज, शारजील खान, उमर अकमल, शोएब मलिक, खर्रम मंजूर, मोहम्मद नवाज, सरफराज अहमद, मोहम्मद आमिर, मोहम्मद हरफान, मोहम्मद समी, वहाब रियाज, अनार अली, इफ्तिखार अहमद आणि इमाद वसीम. वेळ : भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ पासून.