लॉस एंजिलिस : हिजाब घालून आॅलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या अमेरिकेच्या पहिल्या मुस्लिम खेळाडूला लॉस एंजिलिस विमानतळावर अमेरिकेच्या सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी रोखले. जवळपास २ तास ही खेळाडू अधिकाऱ्यांच्या ताब्यात होती.इब्तिहाज महंमद असे या खेळाडूचे नाव असून, ती मागच्या वर्षी रिओ आॅलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या तलवारबाजी संघात होती. सायबर प्रकारात तिने कांस्यपदक जिंकले आहे. पदक जिंकणारी ती पहिली मुस्लिम अमेरिकन खेळाडू ठरली. इब्तिहाज म्हणाली, ‘‘मला रोखण्यामागे काहीच कारण दिले नाही. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने व्हिसाप्रकरणी लावलेल्या निर्बंधामुळे असा प्रकार घडला का, हेदेखील कळेनासे आहे. पण, माझ्या मते, मी मुस्लिम असल्याने असे घडले असावे. माझ्यासोबत असा प्रकार का घडला, हे माहीत नाही; पण मुस्लिम असणे हेच एकमेव कारण दिसते. माझे नाव अरबी भाषेत आहे. मी अमेरिकेचे प्रतिनिधित्व करीत आहे,; शिवाय आॅलिम्पिकपटू आहे. तरीही पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, हे आपण समजू शकता. या घटनेवरून स्थानिकांमध्ये काहीही मतपरिवर्तन झाले नसल्याचे निष्पन्न होते.’’(वृत्तसंस्था)
हिजाब घालणाऱ्या आॅलिम्पिकपटूला विमानतळावर रोखले
By admin | Published: February 10, 2017 2:19 AM