ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, जागतिक स्पर्धेतील पदकविजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया यांच्यामागोमाग आता गोल्डन गर्ल हिमा दास हीनेही कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारला मदतीचा हात दिला आहे. आसामची धावपटू हिमानं आसाम सरकारच्या कोरोना व्हायरस मदत निधीत तिचा एक महिन्याचा पगार जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतात रुग्णांची संख्या 733 पर्यंत पोहोचली असून 20 जणांना प्राण गमवावे लागले आहे. ''कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची हीच ती वेळ आणि सर्वांचा पाठींबा आम्हाला हवा आहे. आसाम राज्य सरकारच्या मदत निधीत मी माझा एका महिन्याचा पगार देत आहे,'' असे हिमानं ट्विट केलं. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिनेही मदतीचा हात पुढे केला आहे. सिंधूनं कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तिनं आंध्र प्रदेश व तेलंगणा मुख्यमंत्री मदतनिधीत ही रक्कम जमा केली आहे. . भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं पश्चिम बंगाल सरकारला 50 लाख किमतीचे तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून ते अन्न गरजूपर्यंत पोहोचेल. भारताचा माजी सलामीवर गंभीरनंही त्याच्या खासदारकी निधीतून दिल्ली सरकारला 50 लाख रुपये दिले. टेनिस स्टार सानिया मिर्झानेही रोजंदारी कामगारांना अन्न आणि मुलभूत वस्तू देण्याचा निर्धार केला. कुस्तीपटू बजरंग पुनियानेही त्याचा सहा महिन्याचा पगार हरयाणा सरकारला दिला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशननेही मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 50 लाख देण्याचा निर्णय घेतला आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
लाखमोलाची मदत; पुण्यातील रोजंदारी कामगारांना MS Dhoniचं आर्थिक सहाय्य