बर्गिंहॅम : राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ चा आज सातवा दिवस आहे. सहाव्या दिवसापर्यंत भारताच्या खात्यात पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि ७ कांस्य पदकांसह एकूण १८ पदकांची नोंद झाली आहे. भारताच्याहिमा दासने महिलांच्या २०० मीटर स्पर्धेत उपांत्यफेरी गाठली आहे. तिने २३.४२ सेंकदात हे अंतर गाठले. हिमा हिट-२ मध्ये अव्वल राहिली असून तिचा उपांत्यफेरीचा सामना अनुक्रमे ५ आणि ६ ऑगस्ट रोजी होईल.
हिमाची उपांत्यफेरीत धडक आसामच्या २२ वर्षीय हिमा दासने २३.४२ सेकंदात अंतर गाठून सर्वांचे लक्ष वेधले. हिमा सुरूवातीला धिम्या गतीने धावली होती मात्र नंतर स्पर्धा संपताच तिने अव्वल स्थान पटकावले. तिने जाम्बियाच्या रोडा नोजोबवू आणि युगांडाच्या जेसेंट न्यामाहुंगे यांच्यासोबत उपांत्यफेरीत जागा मिळवली आहे, जिथे नोजोबवू २३.८५ सेकंदांसह दुसऱ्या स्थानावर आहे तर युंगाडाच्या ॲथलीटने २३.८५ सेकंदांसह तिसरे स्थान पक्के केले आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत पदक विजेते भारतीय खेळाडू
- संकेत महादेव - रौप्य पदक (वेटलिफ्टिंग ५५ किलो)
- गुरूराजा पुजारी - कांस्य पदक (वेटलिफ्टिंग ६१ किलो)
- मीराबाई चानू - सुवर्ण पदक (वेटलिफ्टिंग ४९ किलो)
- बिंद्यारानी देवी - रौप्य पदक (वेटलिफ्टिंग ५५ किलो)
- जेरेमी लालरिनुंगा - सुवर्ण पदक (वेटलिफ्टिंग ६७ किलो)
- अचिंता शेऊली - सुवर्ण पदक (वेटलिफ्टिंग ७३ किलो)
- सुशीला देवी - रौप्य पदक (ज्युडो ४८ किलो)
- विजय कुमार यादव - कांस्य पदक (ज्युडो ६० किलो)
- हरजिंदर कौर - कांस्य पदक (वेटलिफ्टिंग ७१ किलो)
- महिला संघ - सुवर्ण पदक (लॉन बॉल्स)
- पुरूष संघ - सुवर्ण पदक (टेबल टेनिस)
- विकास ठाकूर - रौप्य पदक (वेटलिफ्टिंग ९६ किलो)
- मिश्र बॅडमिंटन संघ - रौप्य पदक
- लवप्रीत सिंग - कांस्य पदक (वेटलिफ्टिंग १०९ किलो)
- सौरव घोषाल - कांस्य पदक (स्क्वॉश)
- तुलिका मान - रौप्य पदक (ज्युडो)
- गुरदीप सिंग - कांस्य पदक (वेटलिफ्टिंग १०९ + किलो)
- तेजस्विन शंकर - कांस्य पदक (उंच उडी)